Ajit Pawar : बारामतीत अधिकारी पैशाला सोकावले... त्यांना सरळ करणार; अजित पवार यांचा बारामतीत इशारा

एका कार्यकर्त्याने निवेदन देत सांगितले की, एक नोंद लावण्यासाठी अधिकाऱ्याने पंधरा हजारांची मागणी केली.
Ajit Pawar
Ajit Pawarsakal
Updated on

बारामती - सातव्या वेतन आयोगाचा पगार मिळतो आहे, आता आठवा वेतन आयोगही दिला जाईल, सर्व आवश्यक सुविधा दिल्या जातात, असे असतानाही बारामतीत सरकारी अधिकारी व कर्मचारी कामासाठी पैशांची मागणी करतात, हे सोकावले असून हे प्रकार खपवून घेणार नाही, त्याचा बंदोबस्तच करतो, असा खणखणीत इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

शुक्रवारी (ता. 28) बारामतीतील डॉ. विशाल व डॉ. निकीता मेहता यांच्या रुग्णालयातील अपेक्स डायलेसिस सेंटर, ज़ॉईंट रिप्लेसमेंट व स्पाईन सेंटरचे उदघाटन अजित पवार यांनी केले. त्या प्रसंगी त्यांनी हा इशारा दिला.

अजित पवार म्हणाले, एका कार्यकर्त्याने निवेदन देत सांगितले की एक नोंद लावण्यासाठी पंधरा हजारांची मागणी केली गेली. काय सुरु आहे बारामतीत असा प्रश्न करत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पगार व सुविधा पुरत नाहीत का असा सवाल करत संबंधिताला संध्याकाळी बोलावून घेतले आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड तुम्हीही संध्याकाळी या त्याच्याकडे चौकशी करु. कुणीही कुणाच्याही वशील्याने बारामतीत आला असेल तरी मी हे खपवून घेणार नाही. यात लक्ष घालून त्यांना सरळ केल्याशिवाय आता गत्यंतर नाही.

कार्यकर्तेही काम निघाले की कंत्राट मागतात, या पुढील ज्यांना कंत्राटदार व्हायचे आहे त्यांनी पुढारी व्हायचे नाही व पुढा-यांनी कामे करायची नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

विकासकामे करताना बारामतीकरांनीही आपली नैतिक जबाबदारी लक्षात घेत व्यवस्थित राहायला हवे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केले.

लोक स्वीय सहायकांना कागदच देत नाहीत....

ज्यांच्या कार्यक्रमासाठी जातो त्यांचे विचारही लोक ऐकू देत नाही, सतत कागद समोर करत राहतात, माझे स्वीय सहायक असतात त्यांच्याकडे कागद देतच नाही, अजित पवारकडेच कागद देतात, त्यांच्याकडे कागद दिला तर काय अक्षर पुसल जाणार आहे का त्यावरच, तेही मलाच आणून देतात ना ते कागद.... मीही 35 वर्षे तुमचे काम करतो.

राज्याची जबाबदारी आता माझ्याकडे आहे, व्याप बघून कामे करावी लागतात, पण तरीही लोक ऐकतच नाही. बटण दाबतात म्हणजे....कधीतरी अस वाटत मी दुस-याला आमदार करु शकतो विधानपरिषदेवर न हात जोडता, विधानपरिषदेचा आमदार इथे आला म्हणजे तुम्हाला समजेल कस असत ते, असे सांगत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

एका क्लिकवर बेडची स्थिती समजणार

धर्मादाय रुग्णालयात राज्यात कोणत्या रुग्णालयात किती बेड शिल्लक आहे याची माहिती एका क्लिकवर समजेल अशी व्यवस्था आता मंत्रालय स्तरावर करण्यात आली आहे. या बाबत एक नवीन कायदा नुकत्याच झालेल्या अधिवेशनात संमत केला असून रुग्णांना या रुग्णालयात उपचार कसे मिळतील याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com