अजित पवार चार ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार

मिलिंद संगई
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

येथील विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार येथे चार ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

बारामती शहर : येथील विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार येथे चार ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

अजित पवार यांच्या निवडणुकीच्या कामासंदर्भात ज्यांच्याकडे ही जबाबदारी असते असे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी आज याबाबत माहिती दिली.

अजित पवार यांच्या राजीनामा नाट्यानंतर अनेक तर्कवितर्क लढविले गेले. अजित पवार राजकीय संन्यास घेणार इथपर्यंत लोकांनी चर्चा केली होती, मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बारामतीत अजित पवार यांना पर्याय नाही, असे स्पष्ट करत अजित पवार हे बारामतीतूनच विधानसभेची निवडणूक लढवणार हे स्पष्ट केले होते.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 4 ऑक्टोबर की अंतिम तारीख असून त्याच दिवशी बारामती शहरातून मिरवणुकीने प्रशासकीय भवनाकडे जात अजित पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती किरण गुजर यांनी दिली.

अजित पवार हे सन 1991 पासून सलग बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडून येत आहेत. आजपर्यंत त्यांनी लढवलेल्या विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये ते विजयी झाले आहेत. यंदा त्यांच्याविरुद्ध कोण उमेदवार असणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही, मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेहमीच्या सवयी प्रमाणे या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर व शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांनी दिली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar will file his candidacy on 4th October