Ajit Pawar : अजित पवार गटाच्या पुणे शहराध्यक्षपदी दीपक मानकर

अजित पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSakal
Updated on

Ajit Pawar - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून पक्षाच्या शहराध्यक्षपदी माजी उपमहापौर दीपक मानकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्तीचे मानकर यांना पत्र दिले.

अजित पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे.

त्याचे पडसाद पुण्यातही उमटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी पुणे शहर व जिल्हा हा बालेकिल्ला असल्याने इथे काय घडामोडी घडतात यास महत्त्व प्राप्त झाले होते. त्यामध्ये शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar Mumbai NCP: अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष नेमला!

त्यामुळे अजित पवार गटाकडून नवे शहराध्यक्ष कोण असतील याची उत्सुकता लागली होती. त्यानुसार अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पवार यांच्या उपस्थितीमध्ये माजी उपमहापौर दीपक मानकर यांची आज पुणे शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

दीपक मानकर हे यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदासाठी इच्छुक होते, पण पक्षांतर्गत विरोधामुळे त्यांच्या ऐवजी प्रशांत जगताप यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने मानकर यांना पुण्याची जबाबदारी दिली आहे.

Ajit Pawar
Mumbai : कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्याची चाळण; दक्षता विभाग शोधणार खड्ड्यांची कारणे...

‘‘अजित पवार यांनी मला शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे ती मी समर्थपणे पार पाडेन. पवार साहेबांबद्दल आदर आहेच. पण सर्व कार्यकर्त्यांशी अजित पवार यांचा संपर्क आहे, माझा ही कार्यकर्त्यांशी कायम संवाद राहिला आहे. त्यामुळे शहरातील ८० टक्के कार्यकर्ते आमच्यासोबत येतील. पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने, नागरिकांना न्याय देण्यासाठी या सरकारचा फायदा होईल. ’’

- दीपक मानकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.