esakal | कार्यकर्त्याच्या पाठीशी अजितदादा खंबीरपणे उभे
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar.jpg

दिवंगत गुरुनाथ कुलकर्णी यांच्या पत्नीच्या उपचारासाठी पुढाकार 

कार्यकर्त्याच्या पाठीशी अजितदादा खंबीरपणे उभे

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : आपल्या कडक स्वभावासाठी प्रसिद्ध असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जेव्हा एखाद्या कार्यकर्त्यावर वेळ येते, तेव्हा तितकेच मृदू होतात आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. याची प्रचिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिवंगत नेते गुरुनाथ कुलकर्णी यांच्या पत्नीच्या उपचारासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे पुन्हा एकदा आली. 

...म्हणून महामेट्रोला जलसंपदा विभागाने पुण्यात ठोठावला दंड ! 

गुरुनाथ कुलकर्णी यांचे पक्षाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान होते. त्यांचे निधन झाल्यानंतर या कुटुंबीयांशी पवार यांचा संपर्क कमी झाला होता. मात्र, त्यांच्या पत्नी स्वप्नगंधा या एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना उपचारासाठी मदतीची गरज असून, त्यांची मुलगी अमेरिकेत असते, असे अजित पवार यांना त्यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांनी सांगितले. तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी तीन लाख

पश्चिम बंगालमध्ये वाढले मुलींचे शाळेत येण्याचे प्रमाण; पुण्यातल्या अधिकाऱ्याची कमाल!

रुपये देत स्वतः डॉक्टरांशी बोलून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, अतिशय आपुलकीने चौकशी करून कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहोत, हे त्यांनी दाखवून दिले. स्वप्नगंधा या लवकर बऱ्या व्हाव्यात, या दृष्टीने सर्व प्रयत्न करा, अशा सूचना संबंधित डॉक्टरांना देण्यासही अजित पवार विसरले नाहीत.