साहित्य संमेलनाध्यक्षपद सन्मानाने द्यावे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता अध्यक्षपद सन्मानाने ज्येष्ठ साहित्यिकाला देण्यात यावे. यासाठी साहित्य परिषदेने आग्रही भूमिका घ्यावी, असा ठराव महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. फलटण येथे ही बैठक झाली. बैठकीत परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांनी ठराव मांडला. 

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाची नव्या आर्थिक वर्षातील ही पहिली बैठक होती. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांच्यासह कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते. प्रा. जोशी म्हणाले, ""साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून अनेक साहित्यिक दूर राहतात. समाजमानस लक्षात घेऊन संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिकाला सन्मानपूर्वक देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. याबाबतची आग्रही भूमिका साहित्य परिषद घेईल.'' 

वाङ्‌मयीन पुरस्कारासाठी सर्व जिल्ह्यांतून परीक्षक 
साहित्य परिषदेचे विभागीय साहित्य संमेलन गुहागर (रत्नागिरी), युवा साहित्य नाट्य संमेलन अंमळनेर (जळगाव), समीक्षा संमेलन पंढरपूर येथे आणि शाखा मेळावा दामाजीनगरला (सोलापूर) घेण्यात येईल. पुढील वर्षीपासून शाखा मेळावा साधेपणाने घेण्यात येईल. त्यासाठीची रक्कम आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या पाच मसाप शाखांना देण्यात येईल. साहित्य परिषदेतर्फे वाङ्‌मयीन पुरस्कार देण्यात येतात. हे पुरस्कार देण्याकरिता पुढील वर्षापासून मसापचे कार्यक्षेत्र असलेल्या सर्व जिल्ह्यांतील तज्ज्ञ व्यक्तींची परीक्षक म्हणून नेमणूक करण्यात येईल.

Web Title: akhil bharatiya marathi sahitya parishad