साहित्य संमेलन अध्यक्षांचा असा ही योगायोग

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दरवर्षी असते. त्याच्या अध्यक्षपदी अनेक मान्यवर साहित्यिकांची निवड होत असते.
Bharat Sasane
Bharat SasaneSakal
Summary

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दरवर्षी असते. त्याच्या अध्यक्षपदी अनेक मान्यवर साहित्यिकांची निवड होत असते.

खडकवासला - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan) दरवर्षी असते. त्याच्या अध्यक्षपदी अनेक मान्यवर साहित्यिकांची (Literary) निवड होत असते. यंदा लातूर जिल्हातील उदगीर येथे होणाऱ्या ९५ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी भारत सासणे (Bharat Sasane) यांची आज निवड झाली. यातील आता पर्यंतच्या सात अध्यक्ष यांचा पुण्याशी निगडीत एक योगायोग आहे.

तो योगायोग म्हणजे पुण्यात कोथरूड परिसरात मागील २१ वर्षापासून साहित्यिक कलावंत संमेलन आयोजित केले जाते. या संमेलनाचे अध्यक्ष होतात. ते पुढे जाऊन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होतात. सासणे यांच्या निवडीमुळे हा योगायोग सातव्यांदा झाला आहे. सासणे निवड झाल्याची माहिती मिळताच साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे, सचिव वि.दा. पिंगळे, उपाध्यक्ष राजेंद्र वाघ यांनी जाऊन सत्कार केला.

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या वतीने पुण्याचे माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक दिलीप बराटे यांच्या वतीने दरवर्षी डिसेंबरमध्ये साहित्यिक कलावंत संमेलनाचे आयोजन केले जाते. भारत सासणे हे २० व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांचे २१ वे साहित्यक कलावंत संमेलन नुकतेच पार पडले. त्यावेळी, संमेलनाचे सूत्र देण्यासाठी तसेच ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी सासणे उपस्थित होते. यावेळी उद्घाटन कार्यक्रमात स्वागताध्यक्ष बराटे यांनी सासणे यांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

Bharat Sasane
गर्दीही नको आणि कार्यक्रमही करायचाय; अजित पवार यांनी असा साधला समतोल

साहित्यिक कलावंत संमेलनाचा उत्तम दर्जा व व्यवस्थापन चांगले असते. यासंमेलनात राज्यातील नामवंत साहित्यिक व कलावंत सहभागी होतात. शहर आणि परिसरातील नवोदितांना यामुळे व्यासपीठ मिळते. अशा या संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान होणारी व्यक्ती पुढील काळात अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होतात.

यापूर्वी डॉ.सदानंद मोरे, फ.मु.शिंदे, उत्तम कांबळे, प्रा. रा.ग. जाधव, आनंद यादव, फादर फ्रान्सिस दिब्रिटो असे सहा व भारत सासणे सातव्यांदा हा योगायोग झालेला आहे. तर राजन खान हे देखील साहित्यिक कलावंत संमेलनाचे अध्यक्ष होते. पुढे जाऊन ते विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले होते. अशा प्रकारे हा योगायोग जुळून आलेला आहे.

बराटे यांनी आज सत्कार केल्यानंतर सासणे यांनी बराटे यांचे कौतुक करताना सांगितले की, मागील २१ वर्षे साहित्यिक कलावंत संमेलन दरवर्षी उत्तम प्रकारे आयोजित करतात. परिसंवाद, चर्चा यातील विषय चालू घडामोडीवर असतात. यातील वक्ते त्या विषयातील दर्जेदार व पारंगत असतात.

बराटे म्हणाले, ‘आम्ही साहित्यिक कलावंत संमेलनात दरवर्षी राज्यातून नामवंत साहित्यिकांनी कलावंतांना निमंत्रित करतो. परिसंवाद, चर्चा, मुलाखत, पुरस्कार, कविसंमेलन असे विविध उपक्रम राबवितो. त्यांचे विचार ऐकण्याची संधी पुणेकरांना आणि नवोदित साहित्यिकांना मिळते. मागील २१ वर्षांपासून आमचा हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमामुळे पुणे शहर आणि परिसरातील नवोदित कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले आहे. मागील वर्षी पासून हे संमेलन समाज माध्यम (सोशल मिडीयावर ऑनलाइन) स्वरुपात ‘साहित्यिक कलावंत संमेलन’ नावाने उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com