स्व. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेत अक्षय भोसलेला ब्राँझ

कृष्णकांत कोबल
सोमवार, 16 एप्रिल 2018

मांजरी खुर्द (पुणे) : राज्यस्तरीय चौथ्या स्व. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेत मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील मल्ल अक्षय भोसले हा ९२ किलो वजन गटातील फ्री स्टाईल प्रकारात तिसऱ्या क्रमांक मिळवून ब्राँझ पदकाचा मानकरी ठरला आहे. राज्य क्रिडा व युवक सेवा संचानालय, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणी विभागिय क्रिडा संकुल कार्यकारी समिती, शिंपोली, बोरीवली (पश्चिम) मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

अक्षय सध्या शिवरामदादा व गोकुळ वस्ताद तालमीत सराव करीत आहे. यापूर्वी दोन वर्षे तो गावातील माणिकदादा तालमीत सराव करीत असे. वडील "कामगार केसरी" बाळासाहेब भोसले, चुलते कुस्तीगीर सुरेश भोसले यांच्यासह महाराष्ट्र केसरी अभिजित कटके यांचे मार्गदर्शन त्याला मिळत आहे.

त्याने मिळविलेल्या यशाबद्दल माजी आमदार बापुसाहेब पठारे, जिल्हा परिषद सदस्य नॅशनल चॅप्पियन न्यानेश्वर कटके यांच्यासह ग्रामस्थांनी  अक्षयचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. 

अक्षय म्हणाला,"महाराष्ट्र केसरी मिळविणे हे अनेक मल्लांचे स्वप्न असते, तसे ते माझेही आहे. वडील, चुलते, महाराष्ट्र केसरी कटके व या क्षेत्रातील अनेक व्यक्तींसह मित्र परिवाराचे मार्गदर्शन मी घेत आहे. स्व. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेमुळे माझा कुस्तीतील मोठ्या यशाबाबत आत्मविश्वास वाढला आहे." 

Web Title: akshay bhosale wins bronze medal in khashaba jadhav wrestling competition