आकुर्डी-चिंचवड रस्ता गैरसोयीचा

संदीप घिसे
सोमवार, 25 जून 2018

पिंपरी - आकुर्डी रेल्वे स्टेशन ते चिंचवड स्टेशन हा नवीन रस्ता दोन महिन्यांपूर्वी वापराकरिता सुरू झाला. मात्र, या रस्त्यावर पथदिवे आणि पदपथ नाहीत. तसेच कचरा संकलन केंद्रामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते. यामुळे हा रस्ता गैरसोयीचा ठरला आहे.

पिंपरी - आकुर्डी रेल्वे स्टेशन ते चिंचवड स्टेशन हा नवीन रस्ता दोन महिन्यांपूर्वी वापराकरिता सुरू झाला. मात्र, या रस्त्यावर पथदिवे आणि पदपथ नाहीत. तसेच कचरा संकलन केंद्रामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते. यामुळे हा रस्ता गैरसोयीचा ठरला आहे.

मुंबई-पुणे महामार्गावरील चिंचवड स्टेशन ते आकुर्डी स्टेशन हा रेल्वेलाइनला समांतर असलेला रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. यामुळे डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय आणि रावेतमार्गे मुंबईला जाणाऱ्यांची सोय झाली आहे. विकास आराखड्यातील हा रस्ता दहा वर्षांपूर्वीच तयार झाला होता. मात्र, दळवीनगर पुलाजवळ तीनशे मीटरच्या जागेबाबत न्यायालयीन वाद उद्‌भवल्याने हा रस्ता रखडला होता. दोन महिन्यांपूर्वी जागा महापालिकेच्या ताब्यात आल्यानंतर तो खुला केला. मात्र, योग्य ठिकाणी मार्गदर्शक फलक न लावल्याने रस्त्याबाबत माहिती मिळत नाही. हा रस्ता १५ मीटर रुंदीचा असून, दोन्ही बाजूस दीड मीटर पदपथाकरिता जागा सोडवली आहे; तसेच दहा वर्षांपूर्वी रस्ता तयार करताना दोन नाल्यांवर पूलही उभारले आहेत. सध्या तयार केलेल्या ३०० मीटरच्या रस्त्याकरिता सुमारे दहा लाखांचा खर्च आला आहे. या रस्त्यावर पथदिवे नाहीत. तसेच दहा वर्षांपूर्वी या रस्त्यावर वर्दळ नसल्याने महापालिकेने कचरा संकलन केंद्र सुरू केले आहे. 

नवीन रस्ता तयार करताना पदपथासाठी जागा सोडली आहे. विद्युत विभागालाही पथदिव्यांबाबत कळविले जाईल. पूर्वी या रस्त्यावर वर्दळ नसल्याने कचरा संकलन केंद्र होते. मात्र, आरोग्य विभाग याबाबत योग्य तो निर्णय घेईल.
- सतीश इंगळे, कार्यकारी अभियंता, महापालिका

या रस्त्यामुळे नागरिकांची सोय झाली आहे. या रस्त्यावर पथदिवे नसल्याने दळवीनगर परिसरात लूटमारीच्या घटना घडत आहेत
- प्रसाद शेट्टी

Web Title: Akurdi-Chinchwad way uncomfortable