आळंदी यात्रेवर सीसीटीव्हीची नजर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

आळंदी - चुकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी, रस्त्यावरील विक्रेत्यांना दूर होण्यासाठी, तसेच सुरक्षाविषयक सूचना देण्यासाठी आळंदी पोलिसांनी बसविलेल्या सीसीटीव्ही यंत्रणा आणि ध्वनिक्षेपकामुळे चांगला परिणाम झाला. रस्त्यावरील हातगाड्यांचे अतिक्रमण कमी झाले आणि चुकलेल्या चोवीस व्यक्तींना त्यांच्या नातेवाइकांकडे पोचता आले.

आळंदी पोलिसांनी मागील वर्षीपासून हा उपक्रम राबविला आहे. यामध्ये आळंदी पोलिसांनी सीसीटीव्ही यंत्रणा बसविली आहे. शहरात इंद्रायणी नदी, प्रदक्षिणा रस्ता आणि महाद्वाराकडे येणाऱ्या रस्त्यांवर ठिकठिकाणी ३० ध्वनिक्षेपक लावले आहे. पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. 

वारी काळात नागरिकांना सूचना देण्यासाठी याचा चांगला उपयोग झाला. वारीत चुकलेल्या चोवीस व्यक्तींना त्यांच्या नातेवाइकांपर्यंत पोचणे ध्वनिक्षेपकामुळे शक्‍य झाले. तर प्रदक्षिणा रस्ता आणि मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यांवरील हातगाडीवरील विक्रेत्यांना सीसीटीव्हीवरून सूचना दिल्या, की लगेच त्या जागेवर हातगाडी हलविली जात होती. यामुळे प्रदक्षिणा रस्ता मोकळा वाटत होता. तर इंद्रायणीकाठी नदीतील पात्रात उतरताना काळजी घ्या. दागिने आणि कपडे सांभाळा, अशा विविध सूचना दिल्यामुळे यंदाच्या वर्षी गेली दोन दिवस नदीतीरावर चोऱ्यांचे प्रमाण कमी झाले. ध्वनिक्षेपक आणि सीसीटीव्ही यंत्रणा पाहण्यासाठी तीन महिला पोलिस कर्मचाऱ्यांची स्वतंत्र नेमणूक केली आहे.

ध्वनिप्रदूषणावर आज कारवाई
धर्मशाळांमध्ये पहाटेपासूनच काही वारकरी मोठ्या आवाजातील कर्णे लावून भजन गात आहेत. दहा ते वीस लोकांची उपस्थिती मात्र मोठ्या आवाजामुळे ध्वनिप्रदूषण होते. याशिवाय रस्त्यावरील खेळणी विक्रेते सिनेमातील गाणी लावून विक्री करत असल्याने सतत ध्वनिप्रदूषण होत आहे. दरम्यान याबाबत सोमवारी (ता. ३) सकाळपासूनच पोलिस कारवाई करतील, असे आळंदी पोलिसांनी सांगितले.

Web Title: Alalndi yatra Kartik Wari CCTV Watch