आळंदीतील भाजप नगरसेवकाची हत्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

आळंदी : पुणे- आळंदी रस्त्यावर वडमुखवाडी येथे वर्दळीच्या रस्त्यावर, भर चौकात आळंदीचे भाजपचे नगरसेवक बालाजी सुधाकर कांबळे (वय 36) यांचा मंगळवारी दुपारी पावणेपाचच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून खून केला. हल्लेखोर घटनास्थळी कोयता टाकून फरार झाले.

आळंदी : पुणे- आळंदी रस्त्यावर वडमुखवाडी येथे वर्दळीच्या रस्त्यावर, भर चौकात आळंदीचे भाजपचे नगरसेवक बालाजी सुधाकर कांबळे (वय 36) यांचा मंगळवारी दुपारी पावणेपाचच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून खून केला. हल्लेखोर घटनास्थळी कोयता टाकून फरार झाले.

पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची चर्चा शहरात आहे. दरम्यान, या घटनेनंतर देहूफाटा येथे तणावाचे वातावरण होते. बालाजी कांबळे मंगळवारी सकाळी कामानिमित्त भोसरीत आले होते. तेथील काम संपवून ते ओला कॅबने पुण्यात गेले. त्यानंतर पुन्हा भोसरीत आले. दुपारी पावणेपाचच्या सुमारास मित्राच्या दुचाकीवरून आळंदीला जात असताना वडमुखवाडी येथे पाठीमागून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्या डोक्‍यावर आणि तोंडावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. 

कांबळे यांच्यावरील हल्ल्याची माहिती समजताच नगरसेवक सचिन गिलबिले, अविनाश तापकीर यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेऊन कांबळे यांना तत्काळ पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, भर चौकात हल्ला झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण झाले होते. 
दिघी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक खंडेराव खैरे यांनी सांगितले की, हल्लेखोरांची संख्या सांगता येत नाही. कांबळे यांच्यावर हल्ल्यानंतर आरोपी पळून गेले. अधिक तपास दिघी पोलिस करत असून, आरोपींच्या शोधार्थ परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात आहेत. 

बिगारी ते बांधकाम व्यावसायिक 
बालाजी कांबळे हे बांधकाम व्यावसायिक होते. पुणे- आळंदी रस्त्यावरील देहूफाटा येथील झोपडपट्टीत गरिबीत त्यांचे बालपण गेले होते. त्यांनी बिगारी ते बांधकाम व्यावसायिक असा टप्पा अल्पावधीत पार केला. 2017 मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या वतीने राखीव प्रभागात निवडणूक लढवून ते विजयी झाले होते. कांबळे यांच्यामागे पत्नी, दोन मुले आणि आई असा परिवार आहे. 

 

Web Title: Alandi BJP corporator's murder