आळंदी - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित हरिनाम सप्ताहाच्या सातव्या दिवशी शुक्रवारी (ता. ९) आळंदी देवस्थान आणि आळंदीकर ग्रामस्थ यांच्या संयुक्तपणे माउलींचा रथोत्सव होणार आहे. यानिमित्त नगरप्रदक्षिणा करण्यात येणार आहे, तसेच इंद्रायणीकाठी साडेसात हजार महिलांच्या उपस्थितीत दीपोत्सव होणार आहे.