आळंदी कोविड सेंटर वापराविना पांढरा हत्ती

Covid-Center
Covid-Center
Updated on

आळंदी - आळंदीत गेली दोन महिने रोज दहा ते बारा रूग्ण कोरोनाग्रस्त आढळत आहेत. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात आरोग्य विभाग आणि पालिकेला अद्याप यश आले नाही. मात्र कोरोनाच्या नावाखाली होणारा खर्च मात्र ठेकेदार आणि कारभारी मिळून फस्त करत असल्याचे चित्र आहे. देहूफाट्यावर बनवलेले कोविड सेंटर कर्मचा-यांअभावी पांढरा हत्ती बनले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जुलै महिन्यापासून आळंदीत कोरोनाचा फैलाव वेगाने सुरू झाला. नागरिकांमधे कोरोनाबाबत भिती राहिली नाही. भाजीवाले, दुकानदार मास्क वापरत नसल्याचे चित्र आहे. त्यातच बाहेरून आळंदीत येणा-यांची संख्या पालिका रोखू शकले नाहीत. आळंदीत रोज लग्न आणि अस्थी विसर्जनासाठी पुणे पिंपरी भागातून लोक गर्दी करत आहेत. यावर पालिका कारवाईसाठी हात आखडता घेत आहे. अर्थकारण असल्याने नागरिकांचा मात्र जिव धोक्यात असल्याचे चित्र आहे. सध्या शहरात रोज दहा ते बारा रूग्ण आढळून येत आहेत. याशिवाय डेंगी आणि चिकुण गुणियाचे रूग्ण वेगळेच. औषध फवारणी,सफाई कामगार यावर नियंत्रण नाही. सार्वजनिक ठिकाणी आजही अस्वच्छता दिसून येते. मच्छरांचा बंदोबस्त पालिकेला करता आला नाही.

आळंदीत देहूफाट्यावर एकशे ऐंशी खाटांचे कोविड सेंटर तयार आहे. मात्र त्यासाठी लागणारे कर्मचारी अद्याप मिळाले नाहीत. कोविड सेंटरमधे अद्याप एक रूग्ण नाही. कर्मचारी उपलब्ध ह्वावे या साठी कुणी प्रयत्नही करत नाही.

कोविड सेंटरसाठीचे गाद्या, खाटा, बेडशीट याचे भाडे मात्र भरावे लागणार हे निष्चित. कर्मचारी नाहीत तर एवढा मोठा पांढरा हत्ती पोसलाच का असा सवाल आळंदीकर विचारत आहेत. शिवाय कोरोनाग्रस्त रूग्णांना महाळूंगे येथे दुरवर जावे लागत आहे. याचबरोबर शहरात कोरोनाचा रूग्ण आढळला की त्याच्या घराभोवती पत्रा आणि बॅनर लावले जात आहे. यासाठीही ठेकेदार नेमला असून त्याचेच उखळ पांढरे कसे होईल याचीच चिंता पदाधिकारी आणि कर्मचा-यांना आहे. सॅनिटाझर, मास्क चढ्या दराने खरेदी केल्या. आपत्कालिन खर्च असल्याने सढळ हाताने पालिका खर्च करत आहेत. कोरोना कालावधीत आजपर्यंत एकूण खर्च किती झाला काही नगरसेवांनाही माहित नाही.

प्रशासनही याबाबत जाहिर खुलासा करत नसल्याचे चित्र आहे. कोरोनाने नागरिक चिंतेत असताना पालिकेत मात्र खालच्या हाताने होणा-या खर्चपाण्याने सर्व अलबेल नसल्याचे चित्र आहे.  

त्यातच नुकतेच नव्याने बदलून आलेले मुख्याधिकारी अंकूश जाधव छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारे राजकारण पाहून भांबावले आहेत. नागरिकांचे काहीही होवो आपल्या खिशात मलिदा कसा पोचेल यासाठी रस्सीखेच सुरू आहे. कोरोनाने रूग्ण वाढतात आम्हाला चिंता नाही. नागरिकांच्या कररूपी पैशातून खर्च कसा वाढेल याचीच चिंता कारभा-यांना असल्याचे चित्र आहे.

याबाबत नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले की आळंदीतील कोविड सेंटरसाठी जिल्हा आरोग्य विभाग कर्मचारी पुरविण्याबाबत उदासिन आहेत. प्रशासन तोंड पाहून कोविडग्रस्त रूग्णाचा परिसर सिल करत आहेत. नगरसेवकांनाही माहिती दिली जात नाही. यापुढे खर्च कमी करण्याबाबत मुख्याधिका-यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com