Alandi News : आळंदी देवस्थान ४३५ एकरमधे साकारतेय भक्तीपीठ; आषाढी वारीवर दाखवणार व्हर्च्युयल वारी

आळंदी देवस्थानकडे स्वताची जागा असल्याने आगामी पाच वर्षात भाविकांना जास्तीत जास्त सोयी उपलब्ध करण्याचा देवस्थानचा मानस आहे.
Alandi
AlandiSakal

आळंदी - आळंदी देवस्थानच्या मालकीच्या गायरान जमीनीत वारकर्‍यांसाठी आळंदी पंढरपुर आषाढी वारीवर आधारित व्हर्च्युयल वारी, भक्तनिवास आणि ज्ञानभूमी या ड्रीम प्रोजेक्टचा युनीट एक अंतर्गत भक्तनिवसाचे भूमिपूजन १२ जानेवारीला दुपारी तीन वाजता होणार आहे. या कामाचे उदघाटन रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.

याबाबत माहीती देताना देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगीतले, आळंदी देवस्थानची चारशे पस्तीस एकर गायरान जमीन आहे. यामधे विकास काम करून वारकर्‍यासाठी भक्तीपीठ व भक्तनिवास केले जात आहे. पाचशे खोल्या आणि तीनशेहून अधिक लोक राहतील असा हाॅल उभारणार आहे. सध्या बत्तीस खोल्यांची निर्मीती केली जात आहे. यासाठी साडे सात कोटी खर्च अपेक्षित आहे. पाचशे दिंड्याची वारी काळात सोयीसाठी विकास केला जाणार आहे.

याचबरोबर वारकरी संप्रदायाची माहीती परंपरा सर्वसामान्यांना माहीती होणे आणि पर्यटन वाढीसाठी आळंदी देवस्थान व्हर्च्युयल वारी हा प्रोजेक्ट जवळपास दोन किलो मिटर परिसरात करत आहे. यामधे पालखी मार्गावरील मंदिरे,तिर्थक्षेत्र प्रतीकृती तयार केली जातील.पायी वारी दिंडी आणि व्हीडीओ स्वरुपात साकारली जाणार आहे. दोन किलोमिटर भाविकांना पायी चालत वारी अनूभवता येणार आहे. वारीतील उभे व गोल रिंगणही या व्हर्च्युयल वारीत अनुभवयास मिळणार आहे.

वारकरी विद्यार्थ्यासाठी अध्यासन केंद्रही केले जात आहे. त्यानंतर अखेरच्या टप्प्यात वारकर्‍यासाठी रुग्णालयही उभारले जाणार आहे.

आळंदी देवस्थानकडे स्वताची जागा असल्याने आगामी पाच वर्षात भाविकांना जास्तीत जास्त सोयी उपलब्ध करण्याचा देवस्थानचा मानस आहे. त्याचप्रमाणे पर्यटन दृष्टीने विचार विकास साधताना केला आहे. मात्र यासाठी मोठी आर्थिक तरतुद देवस्थान भाविकांच्या देणगीवर करत आहे. भक्तनिवास आणि अन्य विकासकामासाठी भाविकांनी थेट आळंदी देवस्थानसोबत संपर्क साधण्याचे आवाहन व्यवस्थापक वीर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com