Pune News: दिवाळीच्या दिवशी आळंदीत आगीच्या दोन घटना; मंदिरामागील इमारतीतील आगीत ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू

Alandi Firefighters Rescue Woman After Deadly Diwali Blaze: आळंदीत एकाच दिवशी आगीच्या दोन घटना; ज्ञानेश्वर मंदिरामागील आगीत वृद्ध महिलेचा मृत्यू
Alandi News 75 Year Old Woman Dies in Building Fire Near Sant Dnyaneshwar Temple on Diwali One More Woman Rescued Safely

Alandi News 75 Year Old Woman Dies in Building Fire Near Sant Dnyaneshwar Temple on Diwali One More Woman Rescued Safely

esakal

Updated on: 

आळंदी : दिवाळीच्या दिवशी आळंदीमध्ये आज दिवसभरात दोन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. यापैकी सोमवारी (ता. 9) संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराच्या दक्षिण बाजूकडील दर्शन मंडपाच्या पाठीमागे एका इमारतीला लागलेल्या आगीच्या घटनेमध्ये पंच्याहत्तर वर्षांची वृद्ध महिला मृत्युमुखी पडली. तर दुसऱ्या एका ज्येष्ठ महिलेला वाचवण्यात यश आले. शकुंतला इंदरकुमार धाडीवाल असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव असून सरला सुमतीलाल लोढा या ज्येष्ठ महिलेला वाचवण्यात यश आले. आगीचे कारण अद्याप निश्चित कळाले नाही.

Loading content, please wait...