

आळंदी (ता. खेड) : इंद्रायणी नदीपात्रात साचलेले सांडपाणी आणि जलपर्णी.
sakal
आळंदी : कार्तिकी वारीसाठी राज्यभरातून वारकरी आळंदीत दाखल झाले असताना, इंद्रायणी नदीची गटारगंगेसारखी अवस्था झाली आहे. पिंपरी चिंचवडमधून येणाऱ्या सांडपाण्यामुळे नदीपात्रावर रासायनिक फेस साचला असून, काही ठिकाणी पात्र कोरडी पडली आहेत. यामुळे वारीसाठी आलेल्या लाखो भाविकांनी तीर्थस्नान कुठे करायचे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.