कार्तिकी वारीसाठी येताना हे लक्षात ठेवा

Varkari
Varkari

आळंदी (पुणे) : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीदिन सोहळ्यात वारकऱ्यांसाठी शुद्ध पाणी, चहा, दाळ-खिचडीचे मोफत वाटप केले जाणार, अशी माहिती आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे यांनी दिली. दरम्यान, मंदिरात येताना भाविकांना पिशव्या, इतर वस्तू आणण्यास बंदी राहणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांचा यंदा 724वा संजीवन समाधिदिन सोहळ्यानिमित्त पुढील आठवड्यापासून आळंदीत कार्तिकी वारी सुरू होणार आहे. मंदिर परिसरात गर्दी होऊ नये यासाठी प्रदक्षिणा रस्ता तसेच प्रमुख चौकांमध्ये देवस्थान पाच स्क्रीन उभारणार आहेत. जेणेकरून त्या-त्या ठिकाणी समाधी दर्शन भाविकांना घेता येईल. देवस्थानच्या वतीने मंदिर परिसरात सवलतीच्या दरातील (केवळ पन्नास रुपये) ज्ञानेश्वरीची पारायण प्रत उपलब्ध होणार आहे. सुमारे वीस हजार छापून तयार आहेत. दहा रुपयांत दोन याप्रमाणे लाडू प्रसादही सुमारे बाराशे क्विंटल बनविण्याचे काम सुरू आहे. मंदिर स्वच्छतेसाठी स्वकाम सेवा, विश्वसामाजिक सेवा मंडळ स्वयंसेवकांची नेमणूक दिवसभरात तीन सत्रात करण्यात आली आहे.

दर्शनबारीतील वारकऱ्यांना मोफत खिचडी वाटप, चहा, पाणी वाटपाची सोय करण्यात येईल. वीजप्रवाह खंडित झाल्यास आपत्कालीन व्यवस्था म्हणून दोन जनरेटरची सोय केली. दर्शनबारीत भाविकांसाठी आरोग्य सुविधा देण्यासाठी बाह्यरुग्ण विभाग सुरू केला जाणार असल्याची माहिती देवस्थानकडून देण्यात आली. समाधी मंदिराच्या पश्‍चिम बाजूस दोन मजली दर्शनमंडपात किमान दोन हजार भाविकांची सोय आहे.

दर्शनासाठी भाविकांना आजोळघरच्या दर्शनबारी आणि पान दरवाजातून देऊळवाड्यात प्रवेश दिला जाणार आहे. हनुमान दरवाजा आणि महाद्वारातून दर्शनानंतर बाहेर पडण्याचा मार्ग राहील. गणेश दरवाजा बंद ठेवण्यात येणार आहे. निमंत्रित पासधारकांना हरिहरेंद्र मठ स्वामी मंदिराजवळील दरवाजातून प्रवेश दिला जाणार आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि मंदिर प्रवेशाचा पासधारकांना हनुमान दरवाजातून प्रवेश दिला जाणार आहे.

वारकऱ्यांच्या दर्शनासाठी इंद्रायणी काठी नदीपलीकडे तात्पुरती दर्शन बारी उभारण्याचे काम केले जाईल. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जागा मिळाल्यानंतर कामास सुरवात होईल. किमान पंधरा ते वीस हजार वारकरी एकावेळी दर्शनबारीत एकत्र येतील अशी सोय या दर्शन मंडपात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com