आळंदीत ९ नोव्हेंबरपासून कार्तिकी यात्रा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

आळंदी - आळंदी (ता. खेड) येथील कार्तिकी वारी सोहळा ९ ते १८ नोव्हेंबरदरम्यान होणार असल्याची माहिती पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांनी दिली.

गुरुवारी (ता. ९) व शुक्रवारी (ता. १०) कीर्तन, प्रवचन असा नैमित्तिक कार्यक्रम मंदिरात आहे. शनिवारी (ता. ११) कार्तिक वद्य अष्टमीला सकाळी गुरू हैबतबाबा पायरी पूजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर योगिराज ठाकूर, बाबासाहेब आजरेकर यांच्या वतीने कीर्तन आणि रात्री वासकर महाराज, मारुतीबुवा कराडकर, आरफळकर यांच्या वतीने जागराचा कार्यक्रम होईल.

कार्तिक वद्य नवमीला रविवारी (ता. १२) बाबासाहेब देहूकर आणि वासकर महाराज यांचे वीणा मंडपात कीर्तन तर कार्तिक वद्य दशमीला सोमवारी (ता. १३) गंगूकाका शिरवळकर, धोंडोपंतदादा शिरवळकर, वासकर महाराज यांचे कीर्तन आणि रात्री वाल्हेकर महाराज यांच्या वतीने जागराचा कार्यक्रम होईल.

मंगळवारी (ता. १४) कार्तिकी वद्य एकादशी असल्याने मध्यरात्रीपासून माउलींच्या संजीवन समाधीवर पवमानपूजा, दुग्धाभिषेक अकरा ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात केला जाणार आहे. त्यानंतर दुपारी माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी देऊळवाड्याच्या बाहेर पडेल. नगरप्रदक्षिणेनंतर पालखी सायंकाळी मंदिरात पुन्हा प्रवेश करेल. कार्तिक वद्य द्वादशीला बुधवारी (ता. १५) मध्यरात्री प्रांताधिकारी आयूष प्रसाद यांच्या हस्ते पहाटपूजा माउलींच्या समाधीवर होईल. त्यानंतर दुपारी रथोत्सवासाठी माउलींची पालखी मंदिरातून बाहेर पडेल. गोपाळपुरा येथे माउलींची पालखी रथात ठेवून नगरप्रदक्षिणा केली जाणार आहे. या वेळी हरिभाऊ बडवे आणि केंदूरकर यांच्या वतीने कीर्तन होईल. त्यानंतर मानकरी, दिंडीकरी सेवेकरी यांना नारळप्रसाद वाटप केले जाणार आहे. कार्तिक वद्य त्रयोदशीला गुरुवारी (ता. १३) माउलींचा मुख्य समाधिदिन सोहळा असून मध्यरात्री प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांच्या हस्ते पवमान अभिषेक माउलींच्या समाधीवर केला जाणार आहे. त्यानंतर सकाळी दहा ते बारा या कालावधित विणामंडपात माउलींच्या समाधी सोहळ्याचे कीर्तन पंढरपुरातील संत नामदेवांचे वंशज नामदास महाराज यांचे होईल. दुपारी बारा वाजता घंटानाद, पुष्पवृष्टी आणि आरती झाल्यानंतर माउलींचा समाधी दिनाचा कार्यक्रम पूर्ण होईल. समाधी दिनाच्या दिवशी गुरुवार असल्याने माउलींची पालखी मंदिरात प्रदक्षिणा होईल. त्यानंतर आरफळकर यांच्या वतीने जागराचा कार्यक्रम होईल. १८ नोव्हेंबरपर्यंत कीर्तन, प्रवचन आणि शेवटी अमावास्येला (ता. १८) समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाची सांगता फटाक्‍यांची आतषबाजी आणि छबिना मिरवणुकीने होईल.

Web Title: alandi news kartiki yatra

टॅग्स