Alandi News : वारकरी केंद्रित बहु ऊद्देशीय ज्ञानभुमी या नियोजित प्रकल्पाचा भुमीपुजन व ध्वजपूजन सोहळा नितीन गडकरी यांच्या हस्ते

पंढरपुर-आळंदी पालखी मार्गावरील दोनशे एकविस किलोमिटरपैकी एकशे श्याहत्तर किलोमिटर काम पुर्ण असून उर्वरित हडपसर ते दिवे घाट रस्त्याचे काम आषाढी वारीपुर्वी पुर्ण होईल.
Nitin Gadkari
Nitin Gadkarisakal

आळंदी - पंढरपुर-आळंदी पालखी मार्गावरील दोनशे एकविस किलोमिटरपैकी एकशे श्याहत्तर किलोमिटर काम पुर्ण असून उर्वरित हडपसर ते दिवे घाट रस्त्याचे काम आषाढी वारीपुर्वी पुर्ण होईल. या कामासाठी आठशे तेविस कोटी निधी मंजुर असून पुढिल महिन्यात भुमीपुजन केले जाणार असल्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आळंदीत सांगीतले.

आळंदी देवस्थानच्या मालकीच्या गायरान जमीनीत वारकरी केंद्रित बहु ऊद्देशीय ज्ञानभुमी या नियोजित प्रकल्पाचा भुमीपुजन व ध्वजपूजन सोहळा शुक्रवारी (ता. १२) रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला. यावेळी ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चारात पुजन केले.

या भुमीपुजन सोहळ्यासाठी शांतिब्रम्ह ह. भ. प. मारोती महाराज कुरेकर, आमदार दिलिप मोहिते, महेश लांडगे, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ, डॉ. भावार्थ देखणे, अॅड. विकास ढगे, लक्ष्मीकांत देशमुख यांची प्रमुख उपस्थीती होती.

यावेळी श्री गडकरी म्हणाले, लहानपणी मी आई वडिलांसोबत आळंदी देहू पंढरपुरला जात असे. यामुळे मंत्री म्हणुन काम करताना वारकर्‍यांचा हा मार्ग चांगला असावा असे नेहमी वाटे. मुंबई महामार्ग विकसन करण्याची संधी मिळाली. पण आता आषाढी वारीसाठी पायी जाणार्‍या वारकर्‍यांची व्यवस्था करण्याची संधीही मलाच मिळाली. पालखी मार्ग विकासाचे पवित्र काम करण्याची ही संधी असल्याने चांगल्या कामाचा आग्रह ठेवला.

आळंदी पंढरपुर आणि देहु पंढरपुर दोन्ही पालखी मार्गाचे काम मार्गी लागले. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर बारामती इंदापुर अकलूज हा एकशे दोन किलोमिटरचा मार्ग पुर्ण झाला. उर्वरित काम पुर्ण करण्यासाठी आषाढी वारीपुर्वी रस्ता पुर्ण करण्याच्या आदेश दिले आहेत.

यावेळी देवस्थानचे विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप यांनी पालखी मार्ग लवकर पुर्ण करण्याची मागणी प्रास्ताविक भाषणात केली होती. दरम्यान ज्ञानेश्वर मेश्राम आणि कार्तिकी गायकवाड यांच्या अभंगवाणीचा कार्यक्रम यावेळी झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com