आळंदी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 डिसेंबर 2016

आळंदी : आळंदी नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदारांनी शांततेत आणि निर्भय वातावरणात मतदान करावे, युवकांनी मतदानाच्या दिवशी सुटीचा आनंद न घेता मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक साबळे यांनी केले.

आळंदी पालिकेसाठी बुधवारी (ता. 14) मतदान आहे. याबाबत गाढे आणि साबळे यांनी सांगितले की, नऊ प्रभागांतून अठरा जागांसाठी निवडणूक होत असली तरी दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित सोळा जागांसाठी 57 उमेदवार तर नगराध्यक्षपदासाठी आठ महिला रिंगणात आहेत. शहरात 17,252 मतदार असून मतदानासाठी पंचवीस केंद्रे आहेत. मतदान यंत्रणेवर देखरेख ठेवण्यासाठी तीन झोनल ऑफिसर नेमले आहेत. मतदान केंद्रावर सुमारे एकशे पंधरा कर्मचारी काम करणार आहेत. सर्व कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

याशिवाय मतदान प्रक्रियेत आर्थिक प्रलोभन देणाऱ्यांवर तसेच निवडणूक प्रक्रियेत बाधा आणणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी दोन भरारी पथक नेमण्यात आली आहेत. याशिवाय सभा, प्रचार फेरीचे व्हिडिओ चित्रीकरण केले जात आहे. आचारसंहिता कक्षाचे प्रमुख म्हणून मंडलाधिकारी ज्ञानेश्वर कारकर यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
आळंदी पालिकेच्या बस स्थानकाजवळ टाऊन हॉलमध्ये 15 तारखेला मतमोजणी केली जाणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी दिली. मतदानाच्या दिवशी प्रदक्षिणा मार्गावर आणि आळंदीत येणाऱ्या वाहनांना एकेरी मार्गाने प्रवेश दिला जाणार आहे.

Web Title: alandi ready for elections