...तर तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो

Pass
Pass

आळंदी (पुणे) : कार्तिकी वारीत दिंडीकरी, मानकरी तसेच स्थानिकांना दिल्या जाणाऱ्या मंदिर प्रवेश आणि दर्शन पासाची नक्कल तयार करून मागील वर्षी काही जणांनी मंदिरात प्रवेश केल्याचे आढळले. यंदा बनावट पास छापून कोणी मंदिर प्रवेश केलाच तर त्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे यांनी सांगितले.

ऍड. ढगे यांनी सांगितले की, आळंदीत आषाढी आणि कार्तिकी वारीत लाखोंच्या संख्येने भाविक येतात. यावेळी देवस्थानच्या वतीने वारी काळात ज्यांचे देवस्थान समिती आणि वारीसाठी योगदान आहे अशा लोकांना मंदिर प्रवेश आणि दर्शनाचे पास दिले जातात. यामध्ये दिंडीकरी, फडकरी, मानकरी, प्रतिष्ठित व्यक्ती, तसेच सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पासधारकांना हरिहरेंद्र स्वामी मठ, हनुमान दरवाजा आणि महाद्वारातून प्रवेश दिला जातो. मात्र, गेल्या वर्षी काही जणांनी देवस्थानने छापलेल्या पासाची नक्कल तयार करून बनावट पास छापून मंदिर प्रवेश केल्याचे देवस्थानच्या नजरेत आले. यामुळे यंदाच्या वर्षी जर कोणी अशा पद्धतीने बनावट पास छापून मंदिर प्रवेश केला तर त्यावर थेट फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल. याशिवाय प्रतिवर्षी दिले जाणारे संबंधितांचे पास कायमस्वरूपी बंदही केले जाणार आहेत.

"बनावट पास' संशोधनाचा विषय...
दहा वर्षांपूर्वी आळंदीतील मोठ्या राजकीय व्यक्तीने बनावट पास छापून विक्री केली होती. मात्र, त्यावेळी कोणतीच कारवाई केली नाही. बनावट पासची निर्मिती करणारी टोळी सक्रिय आहे. देवस्थान पास छापतात, त्यापेक्षा अधिक लोक मंदिर प्रवेश करताना आढळून येतात. अनेकांना देवस्थान तसेच परंपरेशी जवळीक नसणाऱ्यांकडेही मंदिर प्रवेशाचे पास आढळतात. यामध्ये स्वयंसेवक म्हणून मुंबईस्थीत लोकांकडे मोठ्या प्रमाणात पास आढळतात. याचे वितरण कसे केले जाते हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, सध्याच्या देवस्थानच्या विश्वस्त समितीने घेतलेला ठोस निर्णयाचे भाविकांमधून स्वागत केले जात आहे. मात्र, फक्त घोषणा नको तर कारवाई करणे अपेक्षित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com