स्वच्छतेचा संदेश देणारी आळंदी पालिका अस्वच्छ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

आळंदी - शहरातील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य असताना आता पालिका कार्यालयाच्या आवारातही चिखल आणि कचरा अस्ताव्यस्त पडल्याने नागरिकांना घंटागाडीच्या माध्यमातून रोज स्वच्छतेचा संदेश देणारी पालिका स्व:त मात्र कार्यालय आणि आवाराची स्वच्छता राखू शकत नसल्याचे पालिका कार्यालयात गेल्यावर पाहायला मिळत आहे.

आळंदीत ठिकठिकाणी खोदकाम सुरू असल्याने सिमेंटच्या रस्त्यांवरही चिखल साचला आहे. थोडा पाऊस पडला तरी दुचाकीस्वार घसरून पडल्याची दृश्‍य वारंवार पाहायला मिळतात. पद्मावती रस्ता, वडगाव रस्ता, पालिका चौक, मरकळ चौकात चिखलामुळे नागरिकांना चालणेही अवघड झाले आहे. हीच अवस्था नगरपालिका कार्यालयाच्या भोवती दिसून येते. त्यातच शेजारी सुलभ शौचालय आणि भाजी मंडई आहे. भाजी मंडईतील कचराही पालिकेच्या मागील बाजूस उघड्यावर विक्रेत्यांकडून फेकला जात आहे, तर सुलभ शौचालयांची सफाई नीट नसल्याने नागरिकांना दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यात भरीस भर म्हणून पालिका परिसरातील नागरिकांना मच्छरांचा प्रादुर्भाव सतावत आहे. दुसरीकडे पालिका दररोज ओला सुका कचरा वेगळा करा, असे सांगते. दुसरीकडे घनकचरा व्यवस्थापनाचा नागरिकांना धडा देणारी नगरपालिका कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवू शकत नसल्याचे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

Web Title: Alandi is unclean

टॅग्स