पिंपरी: अलार्म वाजला अन्‌ चोरट्यांचा प्रयत्न फसला 

संदीप घिसे 
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

पिंपरी (पुणे) - तेलाची पाइपलाइन फोडण्यासाठी चोरट्यांनी खड्डा खोदण्यास सुरवात केली. मात्र तेल कंपनीच्या मुख्यालयातील अलार्म वाजला. गस्तीवरील पथकास ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोणीतरी येत असल्याचे दिसताच चोरट्यांनी धूम ठोकली. ही घटना शनिवारी पहाटे दिघी येथे घडली.

दिघी परिसरातून एचपीसीएल कंपनीची जमिनीखालून तेलाची पाइपलाइन गेली आहे. या पाइप लाइनजवळ सेंसर बसविण्यात आले आहेत. पाईप लाइनपासून सात फूटापर्यंतच्या अंतरात कोणी खोदाई केल्यास याबाबत धोक्‍याची सूचना देणारा अलार्म मुख्यालयात वाजतो. त्यानुसार गस्तीवरील पथकास सावध केले जाते. 

शनिवारी पहाटेदेखील दिघी परिसरात खोदकाम होत असल्याचा अलार्म वाजला. मुख्यालयातून याबाबत गस्तीवरील पथकास माहिती दिली गेली. गस्तीवरील पथकाने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी धाव घेतली. कोणीतरी येत असल्याचे पाहून चार चोरट्यांनी तेथून धूम ठोकली. चोरट्यांनी तेल चोरण्यासाठी पाइपलाइन जवळ खड्डा केला होता. याबाबत अधिक तपास सहायक निरीक्षक राजेंद्र गिरी करीत आहेत. 

Web Title: Alarm sounds and thieves' attempts are unsuccessful

टॅग्स