Albatya Galbatya 2.0 Drama : ‘अलबत्या गलबत्या’ने रचला इतिहास; सलग सात प्रयोगांचा ‘शिखर विश्वविक्रम’

अद्वैत थिएटर निर्मित ‘अलबत्या गलबत्या २.०’ या नाटकाने सलग सात प्रयोगांचा ‘शिखर विश्वविक्रम’ केला प्रस्थापित.
Albatya Galbatya Creates History  Shikhar World Record for Seven Consecutive Performances

Albatya Galbatya Creates History Shikhar World Record for Seven Consecutive Performances

sakal

Updated on: 

पुणे - अद्वैत थिएटर निर्मित ‘अलबत्या गलबत्या २.०’ या नाटकाने सलग सात प्रयोगांचा ‘शिखर विश्वविक्रम’ प्रस्थापित केला आहे. बालगंधर्व रंगमंदिरात एकाच दिवशी आणि एकाच कलाकार संचाने सलग सात प्रयोग सादर करून मराठी रंगभूमीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया’ या नामांकित संस्थेने या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेत या नाटकाला ‘शिखर विश्वविक्रम’ म्हणून सन्मानित केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com