पुणे : साडेचारशे दारूच्या बाटल्या आणि सुमारे २५ पिशव्या प्लॅस्टिक कचरा संकलित

पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तूचे ठिकाण आता पर्यटन कमी आणि ‘पार्टी स्पॉट’ म्हणून पाहिले जात आहेत. यामुळे अशा वास्तूंवर आढळणाऱ्या कचऱ्यात वाढ झाली आहे.
Alcohol bottle and plastic collection
Alcohol bottle and plastic collectionsakal
Summary

पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तूचे ठिकाण आता पर्यटन कमी आणि ‘पार्टी स्पॉट’ म्हणून पाहिले जात आहेत. यामुळे अशा वास्तूंवर आढळणाऱ्या कचऱ्यात वाढ झाली आहे.

पुणे - शहरातील ऐतिहासिक वास्तूचे ठिकाण आता पर्यटन कमी आणि ‘पार्टी स्पॉट’ (Party Spot) म्हणून पाहिले जात आहेत. यामुळे अशा वास्तूंवर आढळणाऱ्या कचऱ्यात (Garbage) वाढ झाली आहे. पर्यटकांमुळे होणाऱ्या प्लास्टिक (Plastic) कचऱ्याबरोबर मद्यपींकडून टाकण्यात आलेल्या दारूच्या बाटल्यांची (Alcohol Bottle) अधिक भर पडत आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या शनिवारवाडा (Shniwarwada) येथे नुकतेच पुणे प्लॉगर्सच्यावतीने (Pune Plogers) ‘प्लॉगिंग ड्राईव्ह करून तब्बल साडेचारशे दारूच्या बाटल्या आणि सुमारे २५ पिशव्या प्लॅस्टिक कचरा संकलित केला आहे.

सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत म्हणून संस्थेच्या वतीने शनिवारवाडा येथे प्लॉगिंग मोहीम राबवली. या मोहिमेत संस्थेचे समन्वयक भूषण मोरे, प्रफुल्ल मनोलकर यांच्यासह सुमारे ८० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. या मोहिमेबाबत भूषण याने सांगितले, ‘‘संस्थेच्या वतीने प्रत्येक विकेंडला शहरातील विविध ठिकाणी प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन करण्यासाठी प्लॉगिंग मोहीम राबवली जाते. मात्र आता शहरातील विविध ऐतिहासिक वास्तूंवर ही मोहिमांचे आयोजन करत आहोत. पर्यावरण आणि ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धनाच्या अनुषंगाने हे पाऊल उचलण्यात येत असून शनिवारवाडा येथे ४०० हून अधिक दारूच्या बाटल्या आणि सुमारे ३० किलोग्रॅम प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात आला आहे.’’

Alcohol bottle and plastic collection
पुण्यात रविवारी ५२४ नवे कोरोना रुग्ण; जिल्ह्यात ८५० रुग्ण तर दोघांचा मृत्यू

सिंहगड, हनुमान टेकडी या ठिकाणी देखील प्लॉगिंग ड्राईव्ह करण्यात आले. तेथे ४०० ते ५०० दारूच्या बाटल्या संकलित करण्यात आल्या. तसेच चित्र शनिवारवाडा येथे ही दिसून आले. त्यामुळे ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करत असताना त्या ठिकाणी होत असलेल्या पर्यटनावर ही नियंत्रण गरजेचे आहे. शहरातील कित्येक ऐतिहासिक वास्तूंचे ठिकाण आहेत जिथे केवळ पार्टीच्या अनुषंगाने नागरिक भेट देतात. परिणामी येथील पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे प्रफुल्ल म्हणाला.

वणवे रोखण्यासाठी ‘डी वीडींग’ -

उन्हाळ्यात शहर व परिसरातील विविध टेकड्यांवर वणवे लागण्याच्या घटना घडतात. यामुळे तेथील भूभागाबरोबर जैवविविधतेवर ही परिणाम होतो. त्यासाठी विविध संस्थांच्या सहकार्याने टेकड्यांवर वृक्षारोपण आणि त्या परिसरात असलेले गवत, तण काढण्यात (डी वीडींग) येत आहेत. प्लॅस्टिक कचऱ्याच्या संकलनाबरोबर हे उपक्रम राबविण्यात येत आहे, असे संस्थेचा संस्थापक विवेक गुरव याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com