सावधान... शिक्‍क्‍यांचीही बनवेगिरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

हे घ्या उदाहरण
पिंपरीतील कमला क्रॉस रोड येथील दुकानात रबरी शिक्के बनवून मिळतील का याची विचारणा ‘सकाळ’ प्रतिनिधीने केली. दुकानदाराने कोणाच्या नावे शिक्का हवा याचे पत्र मागितले. तुमचेही पत्र चालेल असे दुकानदाराने सांगितले. मात्र या पत्राची शहानिशा दुकानदाराने केली नाही. शिक्के मागणाऱ्या व्यक्तीचे ओळखपत्र तपासले नाही. अवघ्या तासाभरात बनावट शिक्के मिळाला. असाच प्रकार चिंचवड स्टेशन येथील दुकानातही घडला.

शिक्‍क्‍यांचा निष्काळजीपणा
सरकारी कार्यालयात रबरी शिक्‍क्‍यांचा निष्काळजीपणा पाहावयास मिळत आहे. शासकीय कार्यालयात शिक्‍के सुरक्षित ठेवले जात नाहीत. कामावरून घरी परतताना अधिकाऱ्यांसह कर्मचारी महत्त्वाचे शिक्के टेबलवरच ठेवतात. त्यामुळेही एजंट बनावट शिक्के सहजरीत्या तयार करून घेत असल्याचे प्रकार घडत आहेत.

पिंपरी - शहरातील सरकारी कार्यालयांबाहेर एजंट बनावट कागदपत्रे व सह्यांच्या आधारावर रबरी शिक्के सहजरीत्या मिळवत आहेत. या बनवेगिरीतून महत्त्वाची शासकीय कागदपत्रे तयार होत आहेत. आकुर्डीतील अप्पर तहसीलदारांनी नुकतीच अशी कारवाई करून दीडशे बनावट दाखले जप्त केले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निगडी येथील शिधापत्रिका कार्यालयातील रबरी शिक्के मे २०१६ मध्ये चोरीला गेले होते. ते अद्याप मिळाले नाहीत. याबाबत निगडीतील पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल झाली.

शहरातील विविध शासकीय कार्यालयाबाहेरील एजंट बनावट शिक्के वापरत आहेत. महा ई-सेवा केंद्र, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, रेशनिंग कार्यालय, तहसील कार्यालय, पासपोर्ट व महसूल कार्यालयात असे शिक्के सर्रास वापरले जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एजंट बनावट शिक्‍क्‍यांचा वापर करत आहेत. त्यांच्याकडे हे शिक्के नेमके कोठून येतात, हा प्रश्‍न आहे. बनावट कागदपत्रेही तयार होतात. कार्यालयाने केलेल्या कारवाईमध्ये बऱ्याचदा बनावट सही व शिक्‍क्‍यांचा वापर केल्याचे आढळले आहे. 
- गीता गायकवाड, तहसीलदार

एका दिवसात पीएमपी झाली मालामाल; गाठला 2 कोटींचा टप्पा 

शिक्‍क्‍यांसाठी हे गरजेचे
शहरात सत्तर ते ऐंशी दुकानांतून शासकीय, निमशासकीय व खासगी कामकाजासाठी वापरले जाणारे रबरी शिक्के बनविले जातात. सरकारी गोल व आडवे शिक्के बनविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याच्या सहीचे पत्र लागते. तसेच अधिकाऱ्याच्या ओळखपत्राची झेरॉक्‍स आवश्‍यक असते. असे शिक्के नेणाऱ्या व्यक्तीचे नाव व मोबाइलची नोंद या दुकानांमध्ये असणे गरजेचे असते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alert bogus rubber stamp