एका दिवसात पीएमपी झाली मालामाल; गाठला 2 कोटींचा टप्पा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

पीएमपीचे प्रतीदिन सरासरी उत्पन्न एक कोटी 40 लाख ते 1 कोटी 60 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. मात्र, सोमवारी तब्बल दोन कोटी रुपयांच्या उत्पन्नाला पीएमपीने गवसनी घातली. 

पुणे : एकाच दिवसांत सुमारे 1 कोटी 90 लाख रुपये उत्पन्न पीएमपीच्या तिजोरीत सोमवारी दाखल झाले. गेल्या पाच वर्षांत एका दिवसांत मिळालेले हे सर्वाधिक उत्पन्न आहे. पीएमपीच्या सुमारे 1650 गाड्या मार्गावर होत्या अन्‌ त्यामुळे प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

उद्या देशात बंद पण, राज्यातील शाळा मात्र....
 

पीएमपीचे प्रतीदिन सरासरी उत्पन्न एक कोटी 40 लाख ते 1 कोटी 60 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. मात्र, सोमवारी तब्बल दोन कोटी रुपयांच्या उत्पन्नाला पीएमपीने गवसनी घातली. पीएमपीचे चालक, वाहक आणि प्रशासन यांच्या सामुदायिक प्रयत्नांचे हे यश असल्याची प्रतिक्रिया पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठाणकर आणि वाहतूक विभागाचे व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी व्यक्त केली.

Video : पुण्यात अभविप कार्यालयाच्या नामफलकाला फासले काळे

पीएमपीच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीकर परदेशी असताना 6 जानेवारी 2015 ला तब्बल 2 कोटी 5 लाख रुपयांचे उत्पन्न पीएमपीच्या तिजोरीत आले होते. 

Video : शनिवारवाड्यात आले मस्तानीचे वंशज: पाहा कोण आहेत ते?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP earned 2 crore Income in One day