पुलावर पाणी आल्यास मिळणार 'ऍलर्ट'

Pune Bridge
Pune Bridge

पुणे : पावसाळ्यात जिल्ह्यात पाण्याखाली येणाऱ्या पुलांवर अपघात अथवा दुर्घटना होऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अशा पुलांवर स्वयंचलित सेन्सर बसविले आहेत. पुलावरील पाण्याने धोक्‍याची पातळी ओलांडताच त्याचा संदेश या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोबाईलवर मिळेल. त्यावर आपत्कालीन कक्षासह संबंधित विभागांना कळवून तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.

महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले. त्यानुसार सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व पूल सुरक्षित असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकताच केला आहे. याशिवाय ज्या पुलांवर पाणी आल्यानंतर दुर्घटना होण्याची शक्‍यता असते, अशा पुलांचेही स्ट्रक्‍चरल ऑडिट केले आहे.

जिल्ह्यात पावसाळ्यामध्ये पाण्याखाली येणाऱ्या पुलांमध्ये भोर तालुक्‍यातील नीरा नदीवरील पूल, मांजरी खुर्द आणि मांजरी बुद्रुक या दोन गावांना जोडणारा पूल, शिक्रापूर येथील भीमा नदीवरील पूल, तळेगाव येथून एमआयडीसीकडे जाताना इंद्रायणी नदीवरील पुलांसह ग्रामीण भागातील 23 पुलांचा समावेश आहे. तसेच, जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील कामशेतजवळ वडिवळे गावातील इंद्रायणी नदीवरील सांगिसे पूल दरवर्षी तीन-चार वेळा पाण्याखाली जातो. जवळपासच्या आठ-दहा गावांना जोडणारा हा एकच पूल असल्यामुळे दळणवळणाचा संपर्क तुटतो. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार आणि शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. 

पुलांवरील पाण्याने धोकादायक पातळी ओलांडल्यानंतर सेन्सरमुळे अभियंत्यांना ऍलर्टचा संदेश जातो. तेथील परिस्थितीची माहिती मिळताच अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन कक्षाला कळविण्यात येते. पोलिस आणि संबंधित विभागांना माहिती देऊन अशा धोकादायक पुलांवरील वाहतूक थांबविण्यात येते किंवा अन्यत्र वळविण्यात येते, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र राहाणे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com