कोंढव्यातील हज हाऊसला समस्त हिंदू आघाडीचा विरोध

  All Hindu Front opposes Haj House in Kondhwa
All Hindu Front opposes Haj House in Kondhwa

पुणे : सांस्कृतिक केंद्राच्या नावाखाली कोंढव्यामध्ये उभारण्यात येत असलेल्या 'हज हाऊस'मुळे पुणेकरांची सुरक्षितता धोक्यात येणार आहे, असा आरोप करून समस्त हिंदू आघाडीने हज हाऊसच्या उभारणीला विरोध केला आहे. समस्त हिंदू आघाडीतर्फे मिलिंद एकबोटे यांनी याबाबतचे निवेदन  महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, 'सार्वजनिक जागेवर प्रार्थनास्थळे बांधण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे, अशाप्रकारचे बांधकाम झाल्यास महापालिका आयुक्तांना जबाबदार धरण्यात यावे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच  धार्मिक स्थळांच्या बांधकामाला परवानगी देण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना नाहीत, असे राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. हे सर्व डावलून कोंढव्यात जर हज हाऊसचे बांधकाम झाले तर त्याला समस्त हिंदू आघाडी विरोध करेल, असे निवेदनात म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

या निवेदनावर बाळासाहेब विश्वासराव, मुकुंद मासाळ, सुधीर बहिरवाडे, सचिन नेमाडे, मंगेश माने, चेतन बालगुडे, लक्ष्मीकांत मोरे, मालतू मदानी, राज बोरकर, कुणाल साठे, कुमार पंजलकर, मिलिंद एकबोटे, आशिष शहा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com