Corona Virus : 39 हजार स्टेशन मास्तर कोरोनासाठी देणार 21 कोटी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 मार्च 2020

रेल्वेचे भारतामध्ये 39000 स्टेशन मास्तर आहेत. हे सर्वजण या उपक्रमात सहभागी झाले आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांनी दिली आहे. दर महिन्यातील एक दिवसाचा पगार, असे पुढील तीन महिन्यातील तीन दिवसाचा पगार ते पंतप्रधान सहाय्यता निधीला देणार आहेत.स्टेशन मास्तरांच्या पुढील तीन महिन्याच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन प्रशासनाने थेट कापून घ्यावे, यासाठी संघटनेच्यावतीने चंद्रात्रे यांनी पत्र रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना नुकतेच दिले आहे. 

पुणे : कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी समाजाने मदत करावी, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला 'ऑल इंडिया स्टेशन मास्तर असोसिएशन'ने सकारात्मक प्रतिसाद दिला असून 21 कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे. 

लॉकडाऊन असताना पिकअप, टेम्पो घेऊन जात होता कामगारांना; पोलिसांनी पकडले अन्...
रेल्वेचे भारतामध्ये 39000 स्टेशन मास्तर आहेत. हे सर्वजण या उपक्रमात सहभागी झाले आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांनी दिली आहे. दर महिन्यातील एक दिवसाचा पगार, असे पुढील तीन महिन्यातील तीन दिवसाचा पगार ते पंतप्रधान सहाय्यता निधीला देणार आहेत.स्टेशन मास्तरांच्या पुढील तीन महिन्याच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन प्रशासनाने थेट कापून घ्यावे, यासाठी संघटनेच्यावतीने चंद्रात्रे यांनी पत्र रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना नुकतेच दिले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 
पुणे विभागामध्ये 72 रेल्वे स्थानके आहेत. तेथे 356 स्टेशन मास्तर कार्यरत आहेत. त्यांच्याकडून या निधीसाठी 21 लाख 56 हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती या संघटनेचे माजी विभागीय सचिव किरण होजगे यांनी दिली.
 
 Coronavirus : कर्तव्यावर असतानाच पोलिस देतायेत गरजूंना जेवणाचा डबा 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All India Station Masters Association will give 21 crore of the for Corona