अपघातग्रस्तांना आवर्जून मदत करा; कुठलाही त्रास होणार नाही..!

मिलिंद संगई
शनिवार, 28 एप्रिल 2018

बारामती : अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावून येणा-या मदतदूतांना या पुढील काळात कोणत्याही रुग्णालयात थांबून राहावे लागणार नाही किंवा रुग्णालयात शुल्कही भरावे लागणार नाही. राज्य सरकारकडून अशा मदतदूतांना योग्य बक्षीस देण्याचेही निर्देश यात देण्यात आले आहेत.

सेव्हलाईफ फाऊंडेशनने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात सर्वोच न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार केंद्रीय परिवहन विभागाने या बाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्य शासनानेही या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश जारी केले आहेत. 

अपघातग्रस्तांचे प्राण वाचावे या साठी त्यांना मदत करणा-या मदतदूतांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना कोणत्याही विभागाचा त्रास सहन करावा लागू नये या साठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहेत निर्देश
•    मदतदूतांची एकदाच चौकशी करावी, वारंवार चौकशीला बोलावू नये, अपघातग्रस्तांना दवाखान्यात दाखल केल्यावर मदतदूतास तत्काळ जाऊ द्यावे तसेच त्याचा पत्ता घेतल्यानंतर त्याला अजिबात थांबवू नये.
•    पोलिसांना अपघाताची माहिती दिल्यानंतर संबंधिताला वैयक्तिकरित्या हजर होणे किंवा स्वताःची संपूर्ण माहिती पोलिसांना देणे बंधनकारक नाही.
•    कोणत्याही अधिका-याने या बाबत जबरदस्ती केल्यास त्याची विभागीय चौकशी होणार
•    कोणताही दवाखाना किंवा रुग्णालय अपघातग्रस्तांना घेऊन येणा-या मदतदूतांना कोणत्याही परिस्थितीत थांबवून घेणार नाहीत.
•    मदतदूतास गरज भासल्यास अपघातग्रस्ताला दाखल केल्याबद्दल पावती देणे बंधनकारक आहे. 
•    जी रुग्णालय या निर्देशांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
•    अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मदतदूताकडून कोणत्याही प्रकारच्या पैशांची मागणी करु नये. 
•    मदतदूत कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी स्वरुपाच्या न्यायालयीन प्रक्रीयेसाठी उत्तरदायी नसेल.

Web Title: All kind of assistance will be provided for those who help accident victims