esakal | पर्यटकांसाठी खुशखबर! 'एमटीडीसी'ने घेतला महत्त्वाचा निर्णय!
sakal

बोलून बातमी शोधा

MTDC

पर्यटकांना खास मागणीनुसार ऑरगॅनिक फूड, तज्ज्ञांकडून पंचकर्म, आयुर्वेदिक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पर्यटकांसाठी खुशखबर! 'एमटीडीसी'ने घेतला महत्त्वाचा निर्णय!

sakal_logo
By
अनिल सावळे

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेली पर्यटन निवासस्थाने आता पुन्हा पर्यटकांसाठी खुली होत आहेत. त्यामुळे पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या पर्यटनस्थळांचा आनंद लुटता येणार आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यानंतर मार्चपासून पर्यटन महामंडळाची पर्यटक निवासस्थाने बंद होती. त्यामुळे पर्यटकांचाही हिरमोड झाला होता. परंतु राज्य सरकारच्या 'मिशन बिगीन अगेन'नुसार पुन्हा हॉटेल्स आणि लॉज सुरु होत आहेत. तसेच, काही अटी-शर्तींवर रिसॉर्ट्सही सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

मेगा भरती! पुणे जिल्हा परिषद दीड हजार रिक्त पदे भरणार!​

त्यानुसार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची रिसॉर्ट्स सुरू होत आहेत. स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांकडून पर्यटन निवासस्थानांची दुरुस्ती आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व रिसॉर्ट्स सुरू करण्यात येत आहेत, असे पर्यटन महामंडळाकडून सांगण्यात आले. 

ही पर्यटक निवासस्थाने सुरू होणार : 

पर्यटन महामंडळाच्या पुणे विभागांतर्गत माळशेज, माथेरान, महाबळेश्वर, पानशेत, कार्ला-लोणावळा आणि कोयनानगर येथील पर्यटक निवासस्थाने सुरू होत आहेत. 

ग्राहकांना त्रास कशाला? महावितरणला झालेले नुकसान 'असे' भरुन काढा!​

'वेलनेस मेडिकल टुरिझम' :

पर्यटकांसाठी रिसॉर्टवर 'वेलनेस मेडिकल टुरिझम' हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटकांना खास मागणीनुसार ऑरगॅनिक फूड, तज्ज्ञांकडून पंचकर्म, आयुर्वेदिक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण :

कोरोनाचा संसर्ग होऊ नये याबाबत कर्मचाऱ्यांना आवश्यक खबरदारी घेण्याबाबत प्रशिक्षण दिले आहे. थर्मल गन, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

बेरोजगार आहात? काळजी करू नका; ट्रेनिंगदरम्यान मिळणार दरमहा १० हजार अन् त्यानंतर नोकरीही!​

स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊन पर्यटक निवासस्थाने सुरू करण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या आरोग्याची खबरदारी घेण्याबाबत प्राधान्य देण्यात येत आहे. महामंडळाच्या संकेतस्थळावर पर्यटक निवासासाठी बुकिंग सुरू करण्यात येत आहे.
- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image