पुण्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष; या आहेत बिग फाईट! | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

पुण्यातील सर्वाधिक लक्ष असलेला मतदारसंघ म्हणजे कोथरूड. भाजपचे चंद्रकांत पाटील व मनसेचे अॅड. किशोर शिंदे यांच्यात काँटे की टक्कर होईल. तर बारामतीत भाजपच्या गोपिनाथ पडळकर यांनी अजित पवारांना आव्हान दिले आहे. इंदापूरात राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे विरूद्ध भाजपचे हर्षवर्धन पाटील अशी हाय व्हॉल्टेज लढत होईल. 

विधानसभा 2019 :

पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणी आज (गुरुवारी) सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. मतदान केंद्र आणि उमेदवारांची संख्या पाहता कसबापेठ विधानसभा मतदारसंघाचा निकाल दहा वाजेपर्यंत लागण्याची शक्‍यता आहे. तर भोर मतदारसंघात सर्वाधिक मतदान केंद्र असल्याने या ठिकाणी निकालाला थोडा वेळ लागण्याची शक्‍यता आहे. साधारपणे दुपारी बाराच्या दरम्यान सर्व निकाल हाती येतील, असे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

पुण्यात जमावबंदी; कोल्हापूरात मिरवणूकांना बंदी | Election Results 2019

पुण्यातील बिग फाईट
पुण्यातील सर्वाधिक लक्ष असलेला मतदारसंघ म्हणजे कोथरूड. भाजपचे चंद्रकांत पाटील व मनसेचे अॅड. किशोर शिंदे यांच्यात काँटे की टक्कर होईल. तर बारामतीत भाजपच्या गोपिनाथ पडळकर यांनी अजित पवारांना आव्हान दिले आहे. इंदापूरात राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे विरूद्ध भाजपचे हर्षवर्धन पाटील अशी हाय व्हॉल्टेज लढत होईल. तर मावळातल्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ही लढत भाजपचे बाळा भेगडे व भाजपमधून नाराज होऊन राष्ट्रवादीत गेलेल्या सुनिल शेळके यांच्यात होईल.  

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात 246 उमेदवार आहेत. शहरातील मतदानाचा टक्का घसरला आहे. तर ग्रामीण भागात मात्र मतदानाच्या टक्केवारी अधिक आहे. पुणे शहरातील कसबा पेठ, वडगावशेरी, पर्वती, हडपसर, पुणे कॅंटोन्मेट, कोथरूड, शिवाजीनर आणि खडकवासला या आठ मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील धान्य गोदाम येथे होणार आहे. तर पिंपरी - चिंचवड शहरातील तीन मतदारसंघांतील मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुल येथे होणार आहे. ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी संबंधित तालुक्‍याच्या ठिकाणी होणार आहे. 

पुणे : 'या' मतदारसंघात दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना जिंकण्याचा विश्वास; फ्लेक्सबोर्ड छापून तयार

मतमोजणीच्या सुरवातीला सकाळी सात वाजता प्रथम टपाली मतांची मोजणी केली जाणार आहे. टपाली मते मोजणीसाठी स्वतंत्र टेबल ठेवली जाणार आहेत. त्यानंतर आठ वाजता इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांवरील (इव्हीएम) मोजणी सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघात 14 ते 22 टेबल ठेवण्यात आली आहेत. या टेबलवर एकावेळी एक इव्हीएममधील मतांची मोजणी केली जाणार आहे. 

कसबा पेठ, शिवाजीनगर आणि पुणे कॅंटोन्मेट विधानसभा मतदारसंघात 14 टेबल असून मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार आहे. खडकवासला आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राची संख्या जास्त असल्याने याठिकाणी 23 फेऱ्या होणार आहेत. वडगावशेरी आणि पर्वतीमध्ये 22, कोथरुडमध्ये 21 फेऱ्या होणार आहेत. 

अशी होणार मतमोजणी 
विधानसभा मतदारसंघाचे नाव - मतदान केंद्रांची संख्या- टेबलांची संख्या - एकूण फेऱ्या 
जुन्नर - 356 - 14 - 26 
आंबेगाव - 336 - 14 - 24 
खेड - 379 - 14 - 28 
शिरूर - 389 - 14 - 28 
दौंड - 306 -14 - 22 
इंदापूर - 329 - 14 - 24 
बारामती - 368 - 14 - 27 
पुरंदर - 380 - 18 - 22 
भोर - 529 - 22- 25 
मावळ - 370 - 14 - 27 
चिंचवड- 491 -22 - 23 
पिंपरी - 399 - 20 - 20 
भोसरी - 411 - 20 - 21 
वडगावशेरी - 425 - 20 - 22 
शिवाजीनगर - 280 - 14 - 20 
कोथरूड - 370 - 18 - 21 
खडकवासला - 446 -20- 23 
पर्वती - 344 - 16 -22 
हडपसर - 454 -20-23 
पुणे कॅंटोन्मेंट - 274 - 14 - 20 
कसबापेठ - 279-14-20 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All results in Pune city are expected by 12 noon for Vidhansabha Maharashtra results