सर्व पदे भाजपकडेच 

bjp
bjp


पुणे - विधानसभा निवडणुकीत पडझड झाल्यानंतर आता सावरण्याचा इरादा पक्का केलेल्या भाजपने महापालिकेतील सारी पदे आपल्या हाती घेतली असून, मित्रपक्ष "आरपीआय'ला दिलेले उपमहापौरपदही भाजपने काढून घेतले आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौर, स्थायी समिती आणि सभागृहनेतेपद भाजपकडे राहणार आहे. याचा महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राजकीय फायदा होईल, अशी भाजप नेतृत्वाची आशा आहे. 

महापालिकेच्या 2017 आणि त्यानंतरच्या पोटनिवडणुकांतून भाजपला 99 जागा मिळाल्या. त्यात "आरपीआय'च्या भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या पाच नगरसेवकांचा समावेश आहे. महापालिकेतील सत्ता ताब्यात घेतल्यानंतर नवी समीकरणे जुळवून भाजपने उपमहापौरपद "आरपीआय'कडे सोपविले. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला शहरातील आठपैकी दोन जागा गमवाव्या लागल्या, तर चार आमदारांना निसटता विजय मिळाला. विशेष म्हणजे, पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूडमधून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना 25 हजारांचेच मताधिक्‍य मिळाल्याने भाजपला धक्का बसल्याचे मानले जात आहे. या निकालाने भाजपला सावरण्याचा इशारा मिळाल्याने भाजपने पुन्हा घडी बसविण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे महापालिकेतील सर्व पदे आपल्याकडे ठेवून पक्षसंघटना मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. 

पक्षांतर्गत नाराजी 
महापालिकेत नवी समीकरणे जुळविणाऱ्या भाजपने पक्षांतर्गत नाराजीही ओढवून घेतली आहे. सभागृहनेता, स्थायी समिती अध्यक्ष, उपमहापौर आणि स्थायीचे काही सदस्य हे पर्वती विधनासभा मतदारसंघातील असल्याने नगरसेवक उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. एकाच मतदारसंघाला एवढी पदे दिली, तर पक्ष पुन्हा कसा उभा राहील, असे गाऱ्हाणे ते मांडत आहेत. अन्य मतदारसंघांतील नगरसेवकांना संधी द्यायला हवी होती, अशी या नगरसेवकांची मागणी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com