परफेक्ट 35 ; सर्व विषयात मिळविले 35 टक्के गुण

perfect 35
perfect 35

पुणे : शंभर पैकी शंभर पैकी गुण मिळवणे जेवढे अवघड त्यापेक्षा सर्व विषयात 35 गुण मिळवणे म्हणजे दिव्यच. पण हेच दिव्य पुण्यातील एका पठ्याने साध्य केले आहे. भावड्याने मराठी असो वा इंग्लिश किंवा गणित असो वा विज्ञान सर्व विषयात 35 गुण मिळवून परफेटक्ट 35 चा मान मिळवलाय.

आज दहावीचे निकाल जाहीर झाले. कोणी 100 टक्के गुण मिळवले तर कोणी काठावर पास झाले. पुण्यातील एका विद्यार्थ्याने सर्व विषयात ३५ मार्क मिळवून उत्तीर्ण झाला आहे. श्रावण राजेश साळुंके असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. 

धनकवडी येथील बालाजीनगर परिसरातील रोहन माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या वर्गात हा विद्यार्थी आहे.  त्याच्या परफेटक्ट 35 ची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com