पिंपरीतील युतीचे उमेदवार गौतम चाबूकस्वारांचे फेसबूक अकाऊंट हॅक

Facebook account hacks of alliance  candidate  Gautam chabukswar from Pimpri
Facebook account hacks of alliance candidate Gautam chabukswar from Pimpri

पिंपरी : पिंपरी राखीव मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार व आमदार अॅड. गौतम चाबूकस्वार यांचे ऐन विधानसभा निवडणूकीच्या धामधुमीत फेसबुक अकाउंट काल हॅक झाले आहे. त्यामुळे त्यांच्या सोशल मिडीयावरील प्रचाराला खीळ बसली आहे. दरम्यान, या अकाऊंटचा दुरपयोग करुन विरोधकांना चुकीचा मेसेज पाठविला जाऊ नये   म्हणून त्यांनी पोलिसांच्या सायबर क्राईम सेलकडे धाव घेतली. तक्रार दाखल करत याप्रकरणी तातडीने तपास करण्याची मागणी केली. मात्र, काल उशीरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल नव्हता. 

एका चायनीज हॅकरने हे कृत्य केले असल्याचे सायबर सेलच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. पैसे घेऊन व्यावसायिक हॅकर अशी कामे करतात, असे चाबूकस्वार म्हणाले. दरम्यान, यामुळे बदनामी किंवा चुकीची माहिती या अकाउंटवरून देण्याची भीती असल्याने पोलिसांत तक्रार दिली, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, ''मला निवडणुकीत रोखू शकत नसल्याने अकाऊंट हॅक केल्याचे चाबूकस्वार यांनी याबाबत सांगितले.

येत्या २१ तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी पिंपरीतून चाबूकस्वार हे महायुतीचे उमेदवार आहेत. सोशल मिडियासाठी ते व त्यांचे विश्वासू कार्यकर्ते वापरत असलेले फेसबुक अकाऊंट काल सकाळी हॅक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या अकाऊंटवरील मोबाईल नंबर, मेल आयडी, पासवर्ड तसेच नावातही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आमदारांचे स्वीय सहाय्यक विजय जगताप यांनी तातडीने पोलिस आयुक्तालयातील सायबर क्राईमकडे लेखी तक्रार दिली. दरम्यान, फेसबुक अकाउंट हॅक झाल्याने सोशल मिडियावरील चाबूकस्वारांचा प्रचार ठप्प झाला. त्यामुळे त्यांनी आता एक नव्हे चार अकाउंट उघडण्याची खबरदारी घेतली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com