विधानसभेसाठी युती कायम - दानवे

विधानसभेसाठी युती कायम - दानवे

पिंपरी - राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती कायम राहणार असल्याचा पुनरुच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण आणि अन्नपुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी केला. 

शहर भाजपतर्फे रावसाहेब दानवे आणि खासदार गिरीश बापट यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, योगेश टिळेकर, महापौर राहुल जाधव, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडेगिरी, पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे उपस्थित होते. दानवे यांच्या हस्ते भाजपच्या नवीन कार्यालयाचे उद्‌घाटन झाले. 

ते म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपण जेवढे काम केले, तितकेच काम आपल्याला राज्यात पुन्हा सरकार आणण्यासाठी करायचे आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्ष बहुमतात येणार नाही, असा अंदाज वर्तवला गेला होता. मात्र, देशातील मतदारांनी कुणावरही भरवसा न ठेवत पुन्हा एकदा मोदींना मतदान केले.’’ 

काँग्रेस पक्षाला अजून अध्यक्ष सापडेना अशी परिस्थिती झाली आहे. भाजप हा परिवार म्हणून काम करणारा पक्ष असून काँग्रेस पक्ष हा परिवाराची पार्टी आहे. भारतीय जनता पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी, पक्षाचे काम करत राहा, कोणासाठी कधी संधी येईल, हे सांगता येणार नाही. आपल्याला संधीच मिळणार नाही, असे कार्यकर्त्यांनी समजू नये. पक्षाला चांगल्या कार्यकर्त्यांची गरज असल्याचे दानवे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com