शिरूरमध्ये राष्ट्रवादी- भाजप नेत्यांची युती, या कामासाठी घेतली आक्रमक भूमिका

प्रताप भोयटे
Monday, 10 August 2020

तर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राजेंद्र कोरेकर व भाजप युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस दीपक कोकडे यांनी निवेदनाद्वारे आज दिला आहे. 

न्हावरे (पुणे) : राष्ट्रीय महामार्ग विभागाद्वारे मागील चार महिन्यांपासून सुरू असलेले शिरूर तालुक्‍यातील न्हावरे ते तांदळी रस्त्याचे रूंदीकरण संबंधित विभागाने थांबवावे नाही, तर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राजेंद्र कोरेकर व भाजप युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस दीपक कोकडे यांनी निवेदनाद्वारे आज दिला आहे. 

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात एवढ्या टक्क्यांनी वाढ

न्हावरे ते तांदळी रस्त्या हा मूळ रस्ता हा फक्त साडेपाच मीटरचा आहे. रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूच्या शेतजमिनी आमच्या वडिलोपार्जित आहे. मात्र, लॉकडाउनच्या काळात मागील काही दिवसांपासून अचानक या रस्त्याचे संबंधित विभागाने रूंदीकरण सुरू केले आहे. ते सुरू करण्यापूर्वी नियमानुसार लगतच्या जमिनीचे भूसंपादन होऊन संबंधित बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळायला हवा होता. मात्र, याबाबत संबंधित शेतकऱ्यांना मोबदला तर नाहीच साधी शासकीय नियमानुसार आजतागायत नोटीसही प्राप्त झाली नाही किंवा शासकीय अधिकारी भेटीला आला नाही. त्यामुळे परिसरात आश्‍चर्य व्यक्त होत आहे. तरीही रस्त्याच्या काम युध्द पातळीवर बिनदिक्कतपणे सुरू आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्गचे अभियंत्यांशी संपर्क होऊ शकला नाही. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नियमांचे उल्लंघन करून काम 
संबंधित कर्मचारी किंवा अधिकाऱ्याकडे जर शेतकऱ्यांनी शासकीय दस्तऐवजाची मागणी केली तर त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जाता. काम करतानाही संबंधित यंत्रणेकडून नियमांचे उल्लंघन करून, उभ्या पिकाची नुकसान करून काम केले जात आहे. एकूणच या कामासाठी संबंधित यंत्रणेकडून साम-दाम-दंड-भेद या नितीचा वापर केला जात आहे. त्यामुळे न्याय कुणाकडे मागायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

रस्त्याच्या कामाला या परिसरातील कोणाचाच विरोध नाही. मात्र, आम्हा शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या कामासाठी वडिलोपार्जित जमिनी जात आहेत. त्यांचे भूसंपादन व्हावे. त्याबदल्यात संबंधीत शेतकऱ्यांना मोबदला मिळावा. त्याचबरोबर यापु ढे शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करावे. अन्यथा येत्या 15 ऑगस्टपासून रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल. 
- तात्यासाहेब सोनवणे
माजी सरपंच, निर्वी (ता. शिरूर) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An alliance of NCP and BJP leaders for this work in Shirur