युतीचे २०० पेक्षा जास्त उमेदवार जिंकतील - प्रकाश जावडेकर

alliance win more than 200 candidates says prakash javdekar
alliance win more than 200 candidates says prakash javdekar

पुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांनी गडकिल्ले बांधून स्वराज्य निर्माण केले. आता आपण सुराज्य निर्माण करत आहोत. भाजपचे कार्यकर्ते व बूथ म्हणजे गडकिल्ले आहेत. त्यांच्या जोरावर विधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेना युतीचे २०० पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वास केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. 

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील ‘विजय संकल्प बूथ संमेलन’ शुभारंभ लॉन्स येथे आयोजित केला होता. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले, शहराध्यक्ष-आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, नगरसेवक दीपक पोटे, संदीप खर्डेकर, प्रकाश बालवडकर आदी उपस्थित होते. 

किती मतदारांच्या घरात थेट संपर्क आहे, किती जणांना पक्षाचे सदस्य केले, किती मतदारांची प्रत्यक्ष ओळख आहे, नवीन मतदार नोंदणी करून घेतली का, असा प्रश्‍न जावडेकर यांनी कार्यकर्त्यांना विचारला; तसेच कामाला लागा, अशा सूचना दिल्या. 

जावडेकर म्हणाले, की माधुरी मिसाळ या शहराध्यक्ष झाल्या आहेत, आगामी निवडणुकीत भाजपचे आठही आमदार निवडून येतील. यापूर्वी भाजपचे ११ कोटी सदस्य होते. आता १८ कोटी सदस्यसंख्या झाली असून, भाजप जगातील सर्वांत मोठा पक्ष आहे. 

केंद्रात पुन्हा मोदी सरकार आल्यानंतर ९० दिवसांमध्ये कश्‍मीरमधील ३७० कलम, तिहेरी तलाक, असे महत्त्वाचे निर्णय घेतले. यामुळे नागरिकांना पुन्हा भाजपचेच सरकार राज्यात हवे आहे. मोदी सरकारचे काम आणि बूथ स्तरावर असलेली ताकद यामुळे भाजप-शिवसेना युतीचे राज्यात २०० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, असा विश्‍वास जावडेकर यांनी व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com