जोगे धरण परिसरात सायकली व फळझाडांच्या रोपांचे वाटप

दत्ता म्हसकर
बुधवार, 20 जून 2018

जुन्नर : पिंपळगाव जोगा (ता.जुन्नर) येथील स्थायी विकास संस्थेच्या वतीने धरण परिसरातील गरजू नागरिकांना फळ झाडांची रोपे व विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता.20) सायकलीचे वाटप करण्यात आले.

यावेळी विविध प्रजातीच्या सातशे फळांची रोपे व दहा सायकली समारंभ पूर्वक देण्यात आल्या. आपले घर व शेत परिसरात ही झाडे लावून त्याचे संवर्धन करा असे आवाहन संस्थेच्या वतीने यावेळी करण्यात आले. 

या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष शिरीष जठार, सदस्य शशिकांत वाजगे, यश मस्करे, रविंद्र लोहोटे रोटरी क्लब ऑफ ओतूरचे अध्यक्ष विजय वायकर आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रकल्प व्यवस्थापक अभिजित मदने यांनी प्रास्तविक व स्वागत केले. रविंद्र कसबे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Allocating bicycles and fruit trees in Joge dam area