वल्लभ पतसंस्थेकडून विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप

दत्ता म्हसकर
मंगळवार, 26 जून 2018

जुन्नर- काले येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांना दप्तर व शैक्षणिक साहित्याचे सोमवारी ता.25 रोजी समारंभपूर्वक वाटप करण्यात आले. जुन्नर येथील वल्लभ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके, पतसंस्थेचे अध्यक्ष सी. बी. गांधी, माजी सभापती बाजीराव ढोले, संचालक दत्तात्रय म्हसकर, डी एल म्हस्के, उज्वला शेवाळे, शेटीराम चौगुले, माजी नगरसेविका वैष्णवी चतुर, बाळासाहेब सदाकाळ, फिरोज पठाण, उपसरपंच जनार्दन पानसरे, माजी सरपंच रवींद्र पानसरे, शशिकांत पानसरे, कुलदीप नायकोडी, मनीषा काशीद, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.  

बेनके म्हणाले, गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वल्लभ पतसंस्था नेहमीच पुढाकार घेत असते. गांधी म्हणाले, गाव व शाळा यांच्या विकासात पतसंस्थेचे योगदान राहील. यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक दप्तरे, वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिननाथ पानसरे यांनी केले मनीषा उगले यांनी आभार मानले. 

Web Title: Allotment of ducational material to students from Vallabh patasanstha