रहाटणीतील मायेच्या शाळेला शालेय साहित्याचे वाटप 

रमेश मोरे
सोमवार, 21 मे 2018

जुनी सांगवी - रहाटणी येथील नखातेनगर येथे परराज्यातुन पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या शिक्षणापासुन वंचित असलेल्या मजुरांच्या मुलांना येथील जनसेवा फाऊंडेशनचे मनोज वंजारी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी 'मायेची शाळा' भरवत आहेत. याबाबत सकाळ मधुन बुधवार ता.९ मे च्या अंकात बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. सकाळची बातमी वाचुन येथे राहणाऱ्या या मुलांसाठी पिंपरी चिंचवड शहर डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व वहिपेन संकलन समितीच्या वतीने वहिपेन व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. 

कर्नाटक, विदर्भ, मराठवाड्यातील ८० कुटुंब गेली नऊ वर्षापासुन या परिसरात राहतात. रोजंदारी कामधंद्यामुळे या मजुर कुटुंबाना मुलांकडे लक्ष देता येत नाही. या चिमुकल्यांसाठी जनसेवा फाऊंडेशनचे मनोज वंजारी मोकळ्या जागेत मायेची शाळा भरवुन मुलांना  शिक्षणाबरोबरच वैयक्तिक स्वच्छतेचे धडे या शाळेतुन देतात. यावेळी टाटा मोटर्सचे वरिष्ठ व्यवस्थापक अजय घुगे, संजय तेलगोटे, समितीचे प्रभाकर मुळमाने, रमेश जाधव, मिलिंद जाधव, प्रमोद गायकवाड, आदी मान्यवरांच्या हस्ते या चिमुकल्यांना वही पेनचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना विजय कांबळे म्हणाले, गेली तीन वर्षापासुन आम्ही डॉ.बाबासाहेबांच्या जयंतीदिनी नागरीकांनी मेणबत्ती, हार, फुले न आणता एक वही व एक पेन आणुन ती समितीकडे देवुन बाबासाहेबांच्या विचारांची जयंती साजरी करावी ही संकल्पना मांडली. त्याला नागरीकांनी उदंड प्रतिसाद दिला. संकलित झालेल्या वह्या व पेन ग्रामिण भागातील कष्टकरी, वंचिताच्या मुलांपर्यंत पोचवण्याचे काम समिती करत आहे. याचाच एक भाग म्हणुन रहाटणी येथील मायेच्या शाळेतील चिमुकल्यांना वही पेनचे वाटप केल्याने बाबासाहेबांच्या विचारांची जयंती साजरी केल्याचे समाधान आहे.

Web Title: Allotment of school equipment at rahatni mayechi shala