'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांसाठी सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना साकडं; काय केली मागणी वाचा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 August 2020

'कोरोना'चे संकट वाढलेले असताना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) सप्टेंबर- नोव्हेंबर महिन्यात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे केंद्र  बदलून देण्यात नकार दिला आहे. मात्र आता विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा द्यावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे. 

पुणे : 'कोरोना'चे संकट वाढलेले असताना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) सप्टेंबर- नोव्हेंबर महिन्यात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे केंद्र  बदलून देण्यात नकार दिला आहे. मात्र आता विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा द्यावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत राज्यसेवा पुर्व व संयुक्त पुर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.यासाठी निवडक शहरांमध्ये परीक्षाकेंद्रे ठेवण्यात आली आहेत.परंतु सध्या राज्यात कोरोनाची स्थिती असून बहुतेक परीक्षार्थी आपापल्या गावी असून त्यांना परिक्षा देणे शक्य होणार नाही.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने आॅक्टोबर महिन्यात होणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी केंद्र बदलण्याची मुभा दिली होती. त्यामुळे दिल्ली सोडून आपआपल्या राज्यात आलेल्या हजारो परीक्षार्थींना दिलासा मिळाला आहे. त्याच धर्तीवर एमपीएससी'ने केंद्र बदलण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. आपापल्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्र निवडता आले पाहिजे. पण एमपीएससी'ने हे प्रॅक्टिकली शक्य नाही असे सांगत जे परीक्षा केंद्र अर्ज भरताना निवडले आहे तेथेच परीक्षा द्यावी लागेल असे स्पष्ट केले  होते. 

खासदार सुप्रिया सुळे यांना परीक्षार्थींची अडचण लक्षात आल्याने 'यूपीएससी'च्या धर्तीवर एमपीएससी'नेही परीक्षार्थींना जवळ असलेल्या केंद्रावर जाऊन परीक्षा देता यावी या दृष्टीने सोय करावी, विद्यार्थांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतीश गवई यांच्याकडे केली आहे. त्याबाबत ट्विविट करून सुळे यांनी ही माहिती दिली आहे. 

आणखी वाचा - शरद पवार पुन्हा ठरले चाणक्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allow MPSC examination center to be changed says MP Supriya Sule