नगरसेवकांच्या निधीतून सोसायट्यांमध्ये कामाला परवानगी द्या

महापालिका आयुक्तांकडे आमदार सुनील टिंगरे यांची मागणी

पुणे - महाराष्ट्र शासनाने आमदार निधीतून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या जागेवर कामे करण्यास मंजुरी दिली आहे. त्याच धर्तीवर महापालिकेने देखील नगरसेवकांना ‘स’ यादीतून सोसायट्यांच्या आवारातील कामे करण्याची परवागनी द्यावी, अशी मागणी आमदार सुनील टिंगरे यांनी महापालिका आयुक्ताकडे केली आहे.

पुणे महापालिका मोठ्या प्रमाणात सहकारी गृहनिर्माण सोसायट्या आहेत. या सोसायट्यांच्या आवारात शासनाचा निधी खर्च करता येत नाही. सोसायट्यांचे अनेक प्रश्‍न असतात ते सोडविण्यासाठी नागरिक नगरसेवकांकडे पाठपुरावा करत असतात. पण निधी खर्च करण्याची परवानगी नसल्याने त्यांना काहीच करता येत नाही.

महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने, आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर, आमदार निधीमधून कामे करण्यास परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर महापालिका क्षेत्रातील, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये नगरसेवक निधी मधून कामे करण्यास द्यावी अशी मागणी टिंगरे यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

सोसायटीमधील नागरिक मोठ्या प्रमाणात महापालिकेला कर देतात. त्यामुळे राज्य सरकारने सोसायट्यांमध्ये निधी खर्च करायला परवानगी दिली तशीच परवागनी महापालिकेने दिली तर नागरिकांची गैरसोय दूर होईल, असे टिंगरे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com