इंदापूरच्या तरुणाची चीनला टक्कर...टिक टॉकला दिला देशी पर्याय... 

डाॅ. संदेश शहा
Wednesday, 29 July 2020

इंदापूर तालुक्यातील कुल्फी विक्रेता ते पुणे, बारामती येथील आयटी कंपनीचा मालक, अशी गरुडझेप घेतलेल्या राहुल खोमणे या युवकाने आपले सहकारी रणजित घाडगे, अक्षय गोरड, राहुल कदम यांच्या सहकार्याने चीनच्या बंदी घातलेल्या टिक टॉक  

इंदापूर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील कुल्फी विक्रेता ते पुणे, बारामती येथील आयटी कंपनीचा मालक, अशी गरुडझेप घेतलेल्या राहुल खोमणे या युवकाने आपले सहकारी रणजित घाडगे, अक्षय गोरड, राहुल कदम यांच्या सहकार्याने चीनच्या बंदी घातलेल्या टिक टॉक अॅपला पर्याय म्हणून टिक टॅक, हे अॅप बनवले आहे. 

राज्यात दहावीचा निकाल 95 टक्केे

आबालवृद्ध नागरिकांचे मनोरंजन व कला सादरीकरण केंद्रबिंदू ठेवून हे अॅप मराठी, हिंदी व इंग्लिश या भाषेत तयार करण्यात आले असून, पाच दिवसांतच 7 हजार नागरिक हे अॅप वापरू लागले असून, 4 हजार व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या अॅपमध्ये टिक टॉकसारखी फीचर्स आहे. भविष्यात या अॅपवरील युजर्सना पैसे कमवून देण्याचा त्यांचा मानस असून, पॉप्युलर क्रियेटरसाठी ब्ल्यू टिकसुद्धा या अॅपमध्ये आहे. लवकरच हे अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध होणार आहे. 

पुण्यातील 100 वर्षांच्या आजींनी कोरोनाला हरवले

सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते अॅपचा प्रारंभ झाला. या वेळी श्रीराज भरणे, शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल गुंडेकर, सागर पवार, सचिन खामगळ, अजिंक्य वाघ, प्रतीक झोळ, स्वप्नील धुमाळ, सुमित कुलकर्णी आदी उपस्थित होते.

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या वेळी भरणे म्हणाले की, चीनने भारताचे सैनिक कुटनितीने मारल्याने भारत सरकारने चीनच्या ५९ अॅपवर बंदी घातली असून, त्यामध्ये टिक टॉकचा समावेश आहे. त्यामुळे राहुल व सहकाऱ्यांनी संधी ओळखून टिक टॉकला पर्याय म्हणून टिक टॅक हे अॅप बनवले आहे. राहुल व सहकाऱ्यांचे कार्य अनमोल असून, या अॅपचा वापर जास्तीतजास्त लोकांनी करावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An alternative app to Tick Tok made by a youth from Indapur taluka