पर्यायी रस्त्यासाठी पाहणी

कृष्णकांत कोबल
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

मांजरी : येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी सध्याचे फाटक दोन वर्ष बंद राहणार आहे. त्यामुळे होणारी वाहतुकीची गैरसोय टाळण्यासाठी शेजारील जुने रेल्वे फाटक सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाला सादर करण्यात येणार आहे. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सूचनेवरून त्याबाबत रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याकडून संयुक्त पाहणी करण्यात आली आहे.

रेल्वेचे उपमुख्य अभियंता गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता नकुल रणसिंग व अन्य अधिकाऱ्यांसह माजी आमदार महादेव बाबर, शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देशमुख, नगरसेवक नाना भानगिरे, शहर संघटक अमोल हरपळे, उपशहरप्रमुख समीर तुपे, रार खोमणे, विक्रम लोणकर, संदीप मोरे आदी यावेळी उपस्थित होते.

रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात केल्यानंतर दोन वर्ष फाटक बंद करण्यात येणार असल्याचे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे मांजरी-वाघोली रस्त्यावर वाहतुकीची मोठी गैरसोय होणार असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी खासदार आढळराव पाटील यांनी मांजरी येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी पर्यायी रस्त्याची सोय केल्याशिवाय फाटक बंद करू नका अशी सूचना त्यांनी केली होती.

Web Title: Alternative Road Surveys