पुण्यात ऍमनोरा टाऊनशिपची 72 कोटींची थकबाकी; कॉंग्रेसचे गटनेते शिंदे यांचा आरोप

Arvind  shinde
Arvind shinde

पुणे - साडेसतरा नळीतील ऍमनोरा टाऊनशिपकडे मिळकतकराची 72 कोटींची थकबाकी आहे. ती वसूल करण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत आहे. एवढी थकबाकी असूनही केवळ 1 कोटी 28 लाख रुपये भरून घेतले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी बुधवारी केली. तर, यासंदर्भात महापालिकेकडे बाजू मांडली असून, नियमाप्रमाणे कर भरल्याचे ऍमनोरा टाऊनशिपतर्फे स्पष्ट करण्यात आले. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेत हद्दीलगतची अकरा गावे आल्याने या टाऊनशिपला 2017 पासून महापालिकेच्या नियमाप्रमाणे कर लागू झाला आहे. ग्रामपंचायतीच्या नोंदीनुसार टाऊनशिपकडे आधीचा 48 कोटींचा कर होता. त्यासह दोन वर्षांतील सुमारे 72 कोटींच्या कराची महापालिकेकडे नोंद आहे. त्यानंतर 1 कोटी 28 कोटी रुपये भरून घेण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी काढला आहे. त्यावर ही कार्यवाही झाली असून, सामान्य लोकांप्रमाणे टाऊनशिपकडची थकबाकी वसूल करावी, असेही शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. दरम्यान, यासंदर्भात अगरवाल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

टाऊनशिपकडे थकबाकी नाही : देशपांडे 
ग्रामपंचायतींनी चुकीच्या नोंदी करून टाऊनशिपच्या नावे मिळकतकराची बिले दिली होती. त्यावर प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हा परिषदेने कराची रक्कम ठरविली आणि राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे सवलत देऊन अंतिम कर निश्‍चित केला. तो भरला आहे. महापालिकेने सदनिकांना कर आकारायला हवा. त्यानुसार तो भरण्याची तयारी सदनिकाधारकांची आहे. त्यामुळे टाऊनशिपकडे कराची थकबाकी नाही. दुसरी बाब म्हणजे, सरकारच्या धोरणानुसार टाऊनशिपसाठी पाण्याचा स्वतंत्र कोटा आहे. त्यातून त्याचा वापर होतो. पाण्याचे पैसेही भरले जातात, असे ऍमनोरा टाऊनशिपचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com