esakal | हौशी शेतकऱ्याने बैलासाठी मोजले साडेसोळा लाख  
sakal

बोलून बातमी शोधा

The amateur farmer counted for 16 lakh 50 Thousand for bullock

न्यायालयाच्या बंदीमुळे शेतकऱ्यांच्या आवडत्या असलेल्या बैलगाडा शर्यती गेल्या काही वर्षांपासून बंद आहेत. मात्र, भविष्यात ही बंदी उठून पुन्हा बैलगाडा शर्यती सुरू होतील, अशा आशेवर शेतकरी वर्ग आहे. त्यामुळे बैलांची आवड व जिव्हाळा असलेले अनेक शेतकरी बैलांना वाऱ्यावर न सोडता चांगल्याप्रकारे सांभाळ करीत आहेत. या बैलांना भार न समजता त्यांच्या पालनपोषणासाठी मोठा खर्च करीत आहेत.

हौशी शेतकऱ्याने बैलासाठी मोजले साडेसोळा लाख  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ : बैलगाडा शर्यतीवर असलेली बंदी तसेच सध्याच्या तांत्रिक युगात शेतीकामात बैलाचे महत्त्व कमी झाले असले तरी, नवलाख उंब्रे येथील पंडित मामा जाधव या बैलांची आवड असलेल्या हौशी शेतकऱ्याने तब्बल साडेसोळा लाख रुपये किंमत मोजून 'मॅगी' नावाचा बैल खरेदी केला आहे. वाजत-गाजत मिरवणूक काढून या बैलाला त्यांनी घरी आणले. शर्यतबंदी काळातील पुणे जिल्ह्यातील ही आत्तापर्यंतची सर्वांत जास्त किमतीची खरेदी मानली जात आहे. 

भोसरीत एकतर्फी प्रेमातून तरुणीचा गळा चिरून खून

सध्याच्या तांत्रिक युगात शेतीकामात बैलांचा वापर कमी झाला आहे. न्यायालयाच्या बंदीमुळे शेतकऱ्यांच्या आवडत्या असलेल्या बैलगाडा शर्यती गेल्या काही वर्षांपासून बंद आहेत. मात्र, भविष्यात ही बंदी उठून पुन्हा बैलगाडा शर्यती सुरू होतील, अशा आशेवर शेतकरी वर्ग आहे. त्यामुळे बैलांची आवड व जिव्हाळा असलेले अनेक शेतकरी बैलांना वाऱ्यावर न सोडता चांगल्याप्रकारे सांभाळ करीत आहेत. या बैलांना भार न समजता त्यांच्या पालनपोषणासाठी मोठा खर्च करीत आहेत.

मसाज सेंटरच्या नावाने वेश्‍याव्यवसाय;  3 परदेशी तरुणींची सुटका 

नवलाख उंब्रे येथील पंडित मामा जाधव हे प्रसिद्ध बैलगाडा मालक म्हणून तालुक्‍यात प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे सध्या तेरा बैल आहेत. त्यांनी पिंपळवाडी-पाबळ येथील अमोल जाधव व हरीशेठ पवार या शेतकऱ्यांकडून 'मॅगी' नावाचा बैल तब्बल 16 लाख 51 हजार रुपये किमतीला खरेदी केला. या बैलाची तब्येत, नजर व धावण्याची लकब लक्षात घेऊन त्यांनी ही विक्रमी किंमत मोजली. एवढेच नव्हे तर वाजतगाजत मिरवणूक काढून त्याला घरी आणले. हा बैल पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. ही बैल खरेदी तालुक्‍यातील शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय झाली आहे. 

विश्रांतवाडी, मगरपट्टा अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू 


 

loading image