भोसरीत एकतर्फी प्रेमातून तरुणीचा गळा चिरून खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

आरोपी बरकत याचे सुमन यांच्यावर एकतर्फी प्रेम होते. यातूनच बरकत याने शनिवारी (ता 24 ) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास लांडगेनगर येथील के. के. यार्ड या हॅन्डग्लोज बनविण्याच्या कंपणीत सुमन यांचा धारदार हत्याराने गळा चिरून खून केला.

पिंपरी : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना भोसरीतील लांडगेनगर येथे उघडकीस आली. सुमन जयसिंग चव्हाण (वय 22, रा. अष्टविनायक कॉलनी, सद्गुरुनगर, भोसरी, मूळ -इलहाबाद) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

"भीमा सहकारी साखर कारखान्याकडे १३५ कोटींची थकबाकी

याप्रकरणी पोलिसांनी बरकत महंमद खलील अली (वय 20 रा.  लांडगेनगर, भोसरी, मूळ बिहार) याला अटक केली आहे. याप्रकरणी सुमन यांचा भाऊ रोहित जयसिंग चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. 

"बारामतीतील ‘तो’ फ्लेक्‍स अखेर उतरविला

आरोपी बरकत याचे सुमन यांच्यावर एकतर्फी प्रेम होते. यातूनच बरकत याने शनिवारी (ता 24 ) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास लांडगेनगर येथील के. के. यार्ड या हॅन्डग्लोज बनविण्याच्या कंपणीत सुमन यांचा धारदार हत्याराने गळा चिरून खून केला.

अजित पवारांच्या बंडामुळे पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये संभ्रम

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young girl murdered in Bhosari due to One sided love