मस्तानी तलावाचे अदभुत मनमोहक दृश्य प्रवाश्यांना करतय आकर्षित

पावसाने वडकीचा अभिमान समजला जाणारा ऐतिहासिक मस्तानी तलाव पूर्ण भरला आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये समाधान, आनंद आणि उत्साहाचे वातावरण दिसत आहे.
Mastani Lake
Mastani LakeSakal
Summary

पावसाने वडकीचा अभिमान समजला जाणारा ऐतिहासिक मस्तानी तलाव पूर्ण भरला आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये समाधान, आनंद आणि उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

- अभिजीत कुचेकर

फुरसुंगी - या वर्षी सरासरी पेक्षा जास्त झालेल्या पावसाने वडकीचा अभिमान समजला जाणारा ऐतिहासिक मस्तानी तलाव पूर्ण भरला आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये समाधान, आनंद आणि उत्साहाचे वातावरण दिसत आहे. येथील वाहिन्यांमधील आणि तलावातील गाळ काढल्याने डोंगरावरील सगळे पाणी तलावात साठण्यास मदत झाली. वाहिन्यांमध्ये गाळ साठल्याने बरेच पाणी वाहून जात होते.

गेल्या तीन वर्षांनंतर पहिल्यांदा पाणी साठले असे येथील ग्रामस्थ संदीपधाडसी मोडक, विशाल मोडक, सागर मोडक यांनी सांगितले. छोटे-मोठे झरे, धबधबे आणि काटोकाट भरलेला तलाव पाहण्यासाठी दुचाकी आणि चारचाकी प्रवाशी पावसात थांबून हे मनमोहक चीत्र आपल्या मोबाईलमध्ये टिपून ठेवत आहेत. तर काहीजण तालावासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने दिवेघाटात गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने डोंगरावरून मोठया प्रमाणात पाणी वाहिले. ते सगळे जमा झाले. त्यामुळे मस्तानी तलाव पूर्ण सक्षमतेने भरला. बारा कोसाचा घेर असणारा हा मोठा तलाव आहे. तिन्ही बाजूने डोंगर आणि मध्ये तलाव अशी याची रचना असूनसुद्धा तीन वर्ष तलाव पूर्ण क्षमतेने भरत नव्हता. असे अनिकेत भुजबळ, प्रवीण मोडक यांनी सांगितले. यावर्षी मात्र पूर्ण भरल्याने वडकी ग्रामस्थ देखील समाधानी दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com