esakal | Pune : अभिनवमध्ये ई लायब्ररी चा अभिनव उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

abhinav english mediume school

Pune : अभिनवमध्ये ई लायब्ररी चा अभिनव उपक्रम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आंबेगाव बुद्रुक : आंबेगाव येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज संकुलात, वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून आणि कोरोना काळात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ग्रंथालयीन अडचणी लक्षात घेऊन आज ई लायब्ररीचे उदघाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या ई लायब्ररीमध्ये पूर्व प्राथमिक ते कनिष्ठ महाविद्यालया पर्यंतच्या पुस्तकांचा आणि संदर्भ पुस्तकांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोना काळातील ई लर्निंगमुळे विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा विद्यार्थ्यांची डोळे तपासणी शिबीर घेण्यात आले होते. शिबिरातील विद्यार्थ्यांना मोफत चष्माचे वाटपही जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

हेही वाचा: मुनमुन धामेचाचं नाव विनाकारण गोवण्यात आलं; वकिलांचा कोर्टात दावा

यावेळी बोलताना जगताप म्हणाले, कोरोनामुळे अनेक जणांना पुस्तकांसाठी आणि रेफरन्स बुकसाठी लायब्ररी पर्यंत पोहोचता आले नाही. ही लायब्ररीच विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवायची असे ठरवून आणि काळाची गरज ओळखून अभिनवच्या विद्यार्थ्यांना एका क्लिक वर सर्व पुस्तके त्याचबरोबर संदर्भ पुस्तकं मिळावीत म्हणून,१००० पीडीएफ स्वरूपातील पुस्तके असलेली ई लायब्ररी सुरु करण्यात येते आहे.या लायब्ररीचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता वाढवावी.

हेही वाचा: अटलजींच्या भाषणाची क्लीप शेअर करत वरूण गांधींचा भाजपला घरचा आहेर

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. यावेळी, प्राचार्या वर्षा शर्मा,अभिनव बी.एड कॉलेजच्या प्राचार्या कांचन चौधरी,प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिंदू ओल्गा आणि पूनम मोरे यांनी केले.तर आभार बंगाळे यांनी मानले.

loading image
go to top